बाहेरुन कितीही चांगले किंवा महागडे साजूक तूप विकत आणले तरी त्याला घरच्या तुपाची सर नाहीच... आजही कित्येक घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने दुधावरची साय साठवून साजूक तूप तयार केले जाते. घरच्याघरीच साजूक तूप तयार करण्याची पद्धत ही थोडी वेळखाऊ, किचकट असली तरी घरच्या तुपासारखे दुसरे काहीच नाही...घरच्याघरीच साजूक तूप काढल्यानंतर उरलेली बेरी अनेकदा उपयोगी नाही असे समजून चक्क फेकून दिली जाते, पण खरं सांगायचं तर याच बेरीपासून पुन्हा एकदा किमान वाटीभर तरी साजूक तूप काढता येऊ शकते. योग्य पद्धत आणि थोडी काळजी घेतली, तर पहिल्या वेळेस तूप काढल्यानंतर उरलेली बेरी अजिबात वाया न जाता पुन्हा उपयोगात आणता येते(secret to make desi ghee from malai use leftover khoya get extra ghee).
तूप गाळून घेतल्यानंतर भांड्यात जी लालसर 'बेरी' उरते, ती आपण सहसा फेकून देतो किंवा फार तर मुलांसाठी त्यात साखर घालून देतो. पण या बेरीमध्ये अजूनही बरंच तूप शिल्लक असतं. फेकून देण्यापूर्वी या बेरीतून (how to make desi ghee from malai at home) पुन्हा वाटीभर साजूक तूप कसं काढायचं, याची एक सोपी आणि जादुई ट्रिक पाहूयात... यामुळे उरलेल्या बेरीतील तूप तर वाया जाणार नाहीच, पण चिकट, तेलकट भांडं घासण्याचा त्रासही वाचेल.. लोणी कढवून (secret to make ghee from milk cream) उरलेल्या बेरीतून देखील जास्तीचे साजूक तूप कसे काढू शकता याची भन्नाट ट्रिक पाहा...
उरलेल्या बेरीचे किंवा कमी सायित जास्त साजूक तूप काढण्याची युक्ती...
१. प्रत्यक्षात, साजूक तूप काढण्याची ही नवीन पद्धत, नेहमीच्या पारंपारिक पद्धतीपेक्षा थोडी वेगळी आहे. साधारणपणे, आपण साठवलेली साय गरम करून तूप काढतो आणि उरलेल्या बेरीचा वापर करून अनेक पदार्थ तयार करतो. परंतु , इंस्टाग्राम वरील preeti_upadhayay या अकाऊंटवरून उरलेल्या बेरीमधूनही किंवा कमी सायित देखील साजूक तूप कसे काढायचे, याची खास ट्रिक सांगितली आहे. यामुळे फक्त तुपाचे प्रमाणच वाढत नाही, तर ही एक प्रकारची 'झीरो-वेस्ट' (Zero-Waste) पद्धत आहे.
शिरा तोच पण चव एकदम हटके! खाऊन तर बघा शाही 'कॅरॅमल शिरा' - नेहमीच्या शिऱ्याला द्या हटके ट्विस्ट...
२. सर्वप्रथम, साठवून ठेवलेली साय एका जाड कढईत घालून एकत्रित करा. कढई थोडी जाडसरच असावी जेणेकरून साय जळणार नाही. आता गॅस मंद ते मध्यम आचेवर ठेवा. साय हळूहळू वितळू लागेल आणि तिला उकळी येऊ लागेल, जसजशी साय शिजत जाईल, तसतसे तूप वेगळे होईल आणि बेरी खाली कढईच्या तळाशी बसेल.
३. जेव्हा तूप पूर्णपणे वेगळे होईल आणि बेरीला हलकासा तपकिरी रंग येऊ लागेल, तेव्हा गॅस बंद करा. आता हे तूप गाळणीच्या मदतीने गाळून एका स्वच्छ डब्यात किंवा भांड्यात काढा. अशा प्रकारे, तुमच्या पहिल्या बॅचमधील शुद्ध तूप तयार होईल.
नको डाळ-तांदूळ, नको पीठ आंबवण्याची झंझट! फक्त १५ मिनिटांत करा पांढरीशुभ्र, गुबगुबीत जाळीदार इडली....
४. आता उरलेल्या बेरीमध्ये थोडे पाणी आणि ५ ते ६ बर्फाचे तुकडे घाला. पाणी जास्त नसावे, फक्त बेरी त्यात व्यवस्थित भिजेल इतकेच पाणी घाला. या मिश्रणाच्या बरोबर मध्यभागी एक ग्लास किंवा एक छोटी वाटी ठेवा. बर्फाचे तुकडे आणि ग्लासच्या मदतीने बेरीमध्ये असलेले उरलेले लोणी गोठायला सुरुवात होईल आणि हळूहळू वर तरंगू लागेल.
५. जेव्हा तुम्हाला पाण्यावर लोण्याचा थर तरंगताना दिसेल, तेव्हा तो चमचा किंवा पळीच्या मदतीने काळजीपूर्वक काढा. आता हे काढलेले लोणी दुसऱ्या एका भांड्यात घालून मंद आचेवर पुन्हा गरम करा. तुम्ही पाहाल की या लोण्यापासूनही बऱ्यापैकी तूप निघेल. हे तूप देखील गाळून पहिल्या तुपात मिसळा. अशा प्रकारे, आपण कमी सायतीत किंवा सायुक्त तूप कढवल्यानंतर उरलेल्या बेरीपासून देखील पुन्हा साजूक तूप काढू शकता. आहे की नाही हा भन्नाट देसी जुगाड, एकदा नक्की करून तर पाहा…
Web Summary : Don't discard leftover milk solids after making ghee! This simple trick, shared by preeti_upadhayay, extracts more ghee. Add water, ice, let the butter solidify, then reheat. This zero-waste method yields extra ghee.
Web Summary : घी बनाने के बाद बचे हुए खोये को न फेंके! प्रीति_उपाध्याय द्वारा साझा की गई यह सरल तरकीब, और घी निकालती है। पानी, बर्फ डालें, मक्खन को जमने दें, फिर दोबारा गरम करें। यह शून्य-अपशिष्ट विधि अतिरिक्त घी देती है।