आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये अनेक असे पदार्थ आहेत, जे वेगवेगळ्या ऋतुंमध्ये खाल्ले जातात. हिवाळ्यामध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाल्ले जातात. ( Sattu Sharbat Can Be Made In Just A Few Minutes.. See The Recipe)तसेच पावसाळ्यामध्ये शरीराला निरोगी ठेवण्यासाठी, पाण्यामुळे आजारपण येऊ नये म्हणून रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे अन्न आपण खातो. उन्हाळ्यामध्ये शरीराला ऊन्हापासून वाचवतील असे पदार्थ आपण खातो. ( Sattu Sharbat Can Be Made In Just A Few Minutes.. See The Recipe)शरीर जास्त डिहायड्रेटेड होणार नाही याची काळजी आपण घेतो. भरपूर फळे खातो. उन्हाळ्यामध्ये पदार्थांपेक्षा पेये जास्त तयार केली जातात.
शरीरासाठी उत्तम ठरणारे एक पेय आहे. जे उन्हाळ्यामध्ये प्यायलाच हवे. उत्तर भारतामध्ये तयार केले जाणारे हे सातूचे सरबत फारच पौष्टिक आहे. ( Sattu Sharbat Can Be Made In Just A Few Minutes.. See The Recipe)तसेच त्यामध्ये अनेक जीवनसत्वे असतात. चणे, गहू तसेच इतर काही डाळी वापरून सातू तयार केले जाते. त्यापासून लाडू तयार केले जातात. तसेच इतरही काही पदार्थ तयार केले जातात. पचनासाठी सातूचे पीठ उत्तम असते. तसेच शरीराला ताकद पुरवण्याचे कामही हे पीठ करते. शरीराला गारवा प्रदान करण्यासाठी हे पीठ अगदीच उपयुक्त ठरते. सातूमध्ये फायबर असतात. तसेच प्रोटीनही भरपूर असते. सातूचे पदार्थ खाल्यावर इम्यूनिटी सिस्टीम एकदम मस्त काम करते. शरीराला डायड्रेटेड ठेवण्यासाठीचा सातू हा एकदम मस्त उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्यावेच असे हे पेय आहे. तयार करायला अगदीच सोपे आहे.
साहित्य
कांदा, लिंबू, पाणी, सातूचे पीठ, मीठ, जिरे पूड, हिरवी मिरची, कोथिंबीर
कृती
१. कांदा एकदम बारीक चिरून घ्या. त्याच प्रमाणे एक मिरचीही बारीक चिरून घ्या. मध्यम तिखट मिरची वापरा.
२. कोथिंबीरही एकदम बारीक चिरून घ्या.
३. एका पातेल्यामध्ये सातूचे पीठ घ्या. एक ग्लास सरबत तयार करण्यासाठी चार ते पाच लहान चमचे पीठ चिक्कार झाले.
४. पातेल्यामध्ये पीठ घेऊन झाल्यावर त्यामध्ये चवीसाठी मीठ घाला. जिरं पूड घाला. तसेच लिंबू पिळा. थोडेसे पाणी घाला. रवीचा वापर करून ते पीठ व्यवस्थित घुसळून घ्या. त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
५. पीठ एकजीव झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, तसेच मिरची घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. त्यामध्ये आता गार पाणी ओता आणि मिश्रण पातळ करून घ्या.