lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > संकष्टी चतुर्थी स्पेशल : बाप्पाला दाखवा तळणीच्या मोदकांचा नैवेद्य, घ्या सोपी-झटपट रेसिपी...

संकष्टी चतुर्थी स्पेशल : बाप्पाला दाखवा तळणीच्या मोदकांचा नैवेद्य, घ्या सोपी-झटपट रेसिपी...

Sankashti Chaturthi Talniche modak Recipe : खुसखुशीत लागणारे हे गरमागरम मोदक चविष्ट तर लागतातच पण ते होतातही झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2024 02:20 PM2024-01-29T14:20:01+5:302024-01-29T15:16:09+5:30

Sankashti Chaturthi Talniche modak Recipe : खुसखुशीत लागणारे हे गरमागरम मोदक चविष्ट तर लागतातच पण ते होतातही झटपट

Sankashti Chaturthi Talniche modak Recipe : While breaking the fast of Sankashti Chaturthi, show Bappa an offering of fried modaks, get the easy-quick recipe... | संकष्टी चतुर्थी स्पेशल : बाप्पाला दाखवा तळणीच्या मोदकांचा नैवेद्य, घ्या सोपी-झटपट रेसिपी...

संकष्टी चतुर्थी स्पेशल : बाप्पाला दाखवा तळणीच्या मोदकांचा नैवेद्य, घ्या सोपी-झटपट रेसिपी...

गणपती बाप्पा हा तारणहार, विघ्नहर्ता असल्याने आपल्याकडे कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आधी गणपतीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. इतकेच नाही तर गणपतीला आराध्यदैवत मानणारे बरेच जण आपल्या आजुबाजूला असतात. त्यामुळे महिन्यातून एकदा येणाऱ्या गणेश चतुर्थीला बाप्पाचे हे भक्त आवर्जून उपवास करतात. संकष्टी चतुर्थीला केला जाणारा हा उपवास गणपतीची आराधना आणि चंद्रोदयाच्या वेळी बाप्पाची आरती करुन, नैवेद्य दाखवून मग सोडला जातो. यावेळी बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. उकडीचे मोदक करायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे आठवड्याच्या मधल्या वारी चतुर्थी आली तर ते करणे शक्य होतेच असे नाही. अशावेळी तळणीचे मोदक हा उत्तम पर्याय ठरु शकतो. खुसखुशीत लागणारे हे गरमागरम मोदक चविष्ट तर लागतातच पण ते होतातही झटपट. पाहूयात तळणीच्या मोदकांची सोपी रेसिपी (Sankashti Chaturthi Talniche modak Recipe)...

साहित्य -

१. गव्हाचे पीठ - १ वाटी 

२. बारीक रवा - पाव वाटी 

३. तेलाचे मोहन - २ चमचे

४. सुक्या खोबऱ्याचा किस- पाऊण वाटी 

५. खसखस - २ चमचे 

६. पिठीसाखर - अर्धी वाटी 

(Image : Google)
(Image : Google)

७. वेलची पूड - अर्धा चमचा

८. बदाम, काजू , पिस्ता पावडर - अर्धी वाटी 

९. बेदाणे - पाव वाटी 

१०. तेल - २ वाट्या 

कृती - 

१. सगळ्यात आधी गव्हाचे पीठ, रवा आणि चवीपुरतं मीठ घालून घट्टसर कणीक भिजवून घ्यायची. हे पीठ भिजवताना यामध्ये तेल गरम करुन त्याचे मोहन घालावे म्हणजे मोदक खुसखुशीत होण्यास मदत होते.

२. एका पॅनमध्ये खोबरं आणि खसखस लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायची. 

३. गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये सुकामेव्याची पूड आणि पिठीसाखर घालून सगळे चांगले एकजीव करावे.

४. शेवटी यात वेलची पूड आणि बेदाणे घालून सगळे चांगले हलवून एकजीव करावे. 

५. मळलेल्या पीठाच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात.

६. या पुऱ्यांमध्ये गार झालेले सारण भरुन त्याला छान पाकळ्या करुन मोदक बनवावा. 

७. दुसरीकडे कढईत तेल तापायला ठेवून ते गरम होत आले की मोदक यामध्ये गोल्डन ब्राऊन रंगावर छान खरपूस तळून घ्यावेत.

 
 

Web Title: Sankashti Chaturthi Talniche modak Recipe : While breaking the fast of Sankashti Chaturthi, show Bappa an offering of fried modaks, get the easy-quick recipe...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.