Join us

साखरआंब्याला बुरा येऊन लगेच खराब होतो? घ्या रेसिपी- पाक परफेक्ट होऊन वर्षभर टिकेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2025 09:25 IST

Sakharamba Recipe In Marathi: साखर आंबा हौशीने करता पण बुरा येऊन तो लगेचच काही दिवसांत खराब होत असेल तर या काही टिप्स लक्षात ठेवा..(how to make sakharamba?)

ठळक मुद्देसाखरआंबा अवघ्या काही दिवसांतच खराब होण्यामागचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे साखरआंब्याचा पाक कच्चा राहणे..

कैरीचे, आंब्याचे दिवस आता संपत आलेले आहेत. शिवाय पावसालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये लोणचं, साखरआंबा, गुळांबा असे पदार्थ करून झालेले आहेत आणि काही घरांमध्ये पुढच्या एक- दोन दिवसांत ते पदार्थ होणार आहेत. यापैकी साखरआंबा हा असा एक पदार्थ आहे जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. पण बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की मोठ्या हौशीने केलेला साखरआंबा अवघ्या काही दिवसांतच खराब होऊन जातो. त्यावर बुरशी येते आणि मग तो टाकून द्यावा लागतो. असं होण्यामागचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे साखरआंब्याचा पाक कच्चा राहणे (how to make sakharamba?). म्हणूनच साखरआंब्याची ही रेसिपी पाहा. अगदी वर्षभर तुमच्या घरच्या साखरआंब्याला काहीही होणार नाही..(Sakharamba Recipe In Marathi)

साखर आंबा करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ किलो कैऱ्या

३ ते ४ वाट्या साखर

१ टीस्पून वेलची पूड

१ टीस्पून केशर

आंघोळीसाठी वापरा 'हा' पदार्थ- बॉडी पॉलिशिंगसारखी चमकेल त्वचा! साबण, बॉडीवॉश वापरणं विसरूनच जाल

कृती

साखरआंब्यासाठी गावरान आणि कडक कैऱ्या घ्याव्या. थोड्या पिकत आलेल्या कैऱ्यांचा साखरआंबा घातल्यात तो लवकर खराब होण्याची शक्यता जास्त असते.

कैऱ्या ३ ते ४ तास पाण्यात भिजत ठेवाव्या. नंतर त्या स्वच्छ कपड्याने पुसून पुर्णपणे कोरड्या करून घ्या.

 

यानंतर कैऱ्यांचे देठ आणि सालं काढून घ्या आणि मोठ्या आकाराची छिद्रं असणाऱ्या किसनीने कैऱ्या किसून घ्या. बारीक छिद्रांची किसणी वापरल्यास साखरआंबा गचका होतो. त्यामुळे तिचा वापर टाळावा.

रोज योगा करता; पण त्यासोबतच 'या' चुकाही करत असाल तर फायद्यापेक्षा नुकसानच जास्त.. 

कैरीचा किस एखादी वाटी घेऊन त्या प्रमाणात मोजून घ्या. जेवढा किस निघेल त्याच्या दिडपट साखर घाला. जर कैरी आंबट असेल तर हे प्रमाण योग्य आहे. पण जर कैरी तोतापुरीसारखी कमी गोड असेल तर एक वाटी कैरीच्या किसाला एक वाटी साखर हे प्रमाण पुरेसं आहे.

 

यानंतर कैरीचा किस आणि साखर एका भांड्यात एकत्र करून ७ ते ८ तास झाकून ठेवा. त्यानंतर जाड बूड असणाऱ्या कढईमध्ये तो शिजवायला घ्या. साधारण एक किलो साखरआंबा मध्यम आचेवर शिजायला ठेवल्यास २० ते २५ मिनिटे लागतात.

तुमच्यासोबतच तुमचं अख्खं कुटूंब राहील निरोगी, सुदृढ! ८ सवयी लावून घ्या, तब्येत राहील ठणठणीत

तो शिजत असताना वारंवार हलवत राहावा, अन्यथा बुडाला लागू शकतो. जेव्हा पाकाचा रंग बदलून हलका पिवळा होईल आणि त्याला चमक आल्यासारखी दिसेल तेव्हा गॅस बंद करावा. साखरआंबा थंड झाल्यानंतरच त्यात वेलची पूड आणि केशर घालावे. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आंबा