साबुदाणा हा बहुसंख्य लोकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. बच्चे कंपनीपासून ते ज्येष्ठांंपर्यंत सगळ्यांनाच साबुदाणा आवडतो. साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याची खीर असे पदार्थ पाहिले की तोंडाला पाणी सुटतं.. आता या पदार्थांमध्ये आणखी एक पदार्थ सामाविष्ट करून टाका.. तो पदार्थ म्हणजे साबुदाण्याचे सलाड. ही रेसिपी साबुदाण्याच्या इतर रेसिपींपेक्षा खूपच वेगळी आहे (easy and unique recipe of sabudana salad). शिवाय अगदी झटपट होणारी (how to make sabudana salad?). अधूनमधून नाश्त्यासाठी साबुदाणा सलाड खायला हरकत नाही.(sabudana salad recipe)
साबुदाणा सलाड करण्याची रेसिपी
साहित्य
१ कप भिजवलेला साबुदाणा
मध्यम आकाराची बारीक चिरलेली काकडी
बारीक चिरलेला टोमॅटो
२ टेबलस्पून शेंगदाणे
२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ बारीक चिरलेली मिरची
१ चमचा लिंबाचा रस
२ ते ३ चमचे डाळिंबाचे दाणे आणि चवीनुसार मीठ
कृती
सगळ्यात आधी साबुदाणा २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर ७ ते ८ तास पाण्यात भिजवून घ्या.
यानंतर भिजवलेल्या साबुदाण्यातलं जास्तीचं पाणी काढून टाका. साबुदाणा खूप ओलसर झाला असेल तर कढईमध्ये थोडंसं तूप घालून तो हलकासा परतून घ्या.
टोमॅटोमधल्या अळ्या पाहून चक्रावून गेली सनी लिओनी! तसं होऊ नये म्हणून टोमॅटो घेताना ३ गोष्टी तपासा..
यानंतर तो एका भांड्यात काढा. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली काकडी, टोमॅटो, शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे असं सगळं घाला. सगळ्यात शेवटी लिंबाचा रस, मीठ आणि चिमूटभर साखर घाला. सगळे पदार्थ एकदा व्यवस्थित हलवून झाले की साबुदाण्याचं सलाड झालं तयार..