Lokmat Sakhi >Food > साबुदाणा सलाड! फक्त उपवासालाच कशाला, नाश्त्यासाठी नेहमीच करून खा भरपूर एनर्जी देणारा पौष्टिक पदार्थ 

साबुदाणा सलाड! फक्त उपवासालाच कशाला, नाश्त्यासाठी नेहमीच करून खा भरपूर एनर्जी देणारा पौष्टिक पदार्थ 

Sabudana Salad Recipe: साबुदाण्याचा हा एकदम वेगळा पदार्थ एखाद्या दिवशी नात्यामध्ये खाऊन पाहा..(How to make sabudana salad?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2025 09:20 IST2025-08-22T09:13:27+5:302025-08-22T09:20:01+5:30

Sabudana Salad Recipe: साबुदाण्याचा हा एकदम वेगळा पदार्थ एखाद्या दिवशी नात्यामध्ये खाऊन पाहा..(How to make sabudana salad?)

sabudana salad recipe, how to make sabudana salad, easy and unique recipe of sabudana salad | साबुदाणा सलाड! फक्त उपवासालाच कशाला, नाश्त्यासाठी नेहमीच करून खा भरपूर एनर्जी देणारा पौष्टिक पदार्थ 

साबुदाणा सलाड! फक्त उपवासालाच कशाला, नाश्त्यासाठी नेहमीच करून खा भरपूर एनर्जी देणारा पौष्टिक पदार्थ 

Highlightsही रेसिपी साबुदाण्याच्या इतर रेसिपींपेक्षा खूपच वेगळी आहे.

साबुदाणा हा बहुसंख्य लोकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. बच्चे कंपनीपासून ते ज्येष्ठांंपर्यंत सगळ्यांनाच साबुदाणा आवडतो. साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याची खीर असे पदार्थ पाहिले की तोंडाला पाणी सुटतं.. आता या पदार्थांमध्ये आणखी एक पदार्थ सामाविष्ट करून टाका.. तो पदार्थ म्हणजे साबुदाण्याचे सलाड. ही रेसिपी साबुदाण्याच्या इतर रेसिपींपेक्षा खूपच वेगळी आहे (easy and unique recipe of sabudana salad). शिवाय अगदी झटपट होणारी (how to make sabudana salad?). अधूनमधून नाश्त्यासाठी साबुदाणा सलाड खायला हरकत नाही.(sabudana salad recipe)

साबुदाणा सलाड करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ कप भिजवलेला साबुदाणा

मध्यम आकाराची बारीक चिरलेली काकडी

बारीक चिरलेला टोमॅटो

२ टेबलस्पून शेंगदाणे

ज्येष्ठा- कनिष्ठा गौरींना साडी नेसवणं अवघड वाटतं? 'या' पद्धतीच्या साड्या निवडा-चटकन नेसवून करा सुंदर आरास

२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

१ बारीक चिरलेली मिरची

१ चमचा लिंबाचा रस

२ ते ३ चमचे डाळिंबाचे दाणे आणि चवीनुसार मीठ

 

कृती

सगळ्यात आधी साबुदाणा २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर ७ ते ८ तास पाण्यात भिजवून घ्या.

यानंतर भिजवलेल्या साबुदाण्यातलं जास्तीचं पाणी काढून टाका. साबुदाणा खूप ओलसर झाला असेल तर कढईमध्ये थोडंसं तूप घालून तो हलकासा परतून घ्या.

टोमॅटोमधल्या अळ्या पाहून चक्रावून गेली सनी लिओनी! तसं होऊ नये म्हणून टोमॅटो घेताना ३ गोष्टी तपासा..

यानंतर तो एका भांड्यात काढा. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली काकडी, टोमॅटो, शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे असं सगळं घाला. सगळ्यात शेवटी लिंबाचा रस, मीठ आणि चिमूटभर साखर घाला. सगळे पदार्थ एकदा व्यवस्थित हलवून झाले की साबुदाण्याचं सलाड झालं तयार.. 

 

Web Title: sabudana salad recipe, how to make sabudana salad, easy and unique recipe of sabudana salad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.