Join us

साबुदाणा खिचडी पदार्थ एक, मात्र रेसिपी अनेक! पाहा साबुदाणा खिचडीच्या एकसे एक रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2025 11:06 IST

Sabudana Khichdi: many recipes! Check out each recipe for Sabudana Khichdi : साबुदाणा खिचडी करायच्या विविध पद्धती.

उपास म्हणजे साबुदाणा तर हवाच. घरोघरी साबुदाण्याचे विविध पदार्थ केले जातात. फार चविष्ट असतात. साबुदाणा वडे केले जातात तसेच थालीपीठही केले जाते. साबुदाण्याचे पीठ वापरुनही विविध पदार्थ केले जातात. (Sabudana Khichdi: many recipes! Check out each recipe for Sabudana Khichdi)कितीही पदार्थ केले तरी एक पदार्थ सगळेच आवडीने खातात. 

१. मात्र राजा पदार्थ असतो साबुदाणा खिचडी. नाश्त्याला नाही तर जेवणात किंवा मग संध्याकाळी केली जाते. पण उपासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी हवीच. विविध ठिकाणी खिचडी करायची पद्धत जरा वेगळी असते. उपास करण्याची पद्धत वेगवेगळी असते. उपासाला खाल्ले जाणारे पदार्थही वेगळे असतात. 

२. काही ठिकाणी उपासाला लाल तिखट चालते. तर काही ठिकाणी चालत नाही. त्यामुळे साबुदाणा खिचडी करताना लाल तिखट घातले जाते. त्यामुळे खिचडीचा रंग लाल असतो. बऱ्याच ठिकाणी साबुदाणा, शेंगदाणे, नारळ, हिरवी मिरची, जिरे घालून खिचडी केली जाते. बटाटाही घातला जातो. बटाट्यामुळे खिचडी फार छान लागते. छान अशी बटाटे परतून केलेली खिचडी मस्त लागते. 

३.काही घरी बिना बटाटा खिचडी होतच नाही तर काही घरी साबुदाणा आणि दाण्याचे कुट हे पदार्थ घालून खिचडी केली जाते. इतर कोणते पदार्थ फार घातले जात नाहीत. तसेच काही ठिकाणी उपासाला कोथिंबीर चालते. अशावेळी हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून साबुदाणा खिचडी केली जाते. त्याला जिऱ्याची फोडणी द्यायची. तसेच त्यात बारीक चिरलेले बटाटे घातले जातात.  चवीला मस्त लागते.

तुम्ही खिचडी तेलावर करता का तुपावर ? दोन्ही प्रकारे साबुदाणा खिचडी केली जाते. तेलावर केलेलीही मस्त लागते. आणि तुपावर केलेलीही. तुपावर केलेली खिचडी मऊ होते तर तेलावर केलेली जास्त मोकळी होते. चवही वेगळी असते.    

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.