lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > छोटी भूक भागवण्यासाठी चिप्स - कुरकुरे खाणं टाळा, घरीच करा कुरकुरीत मसाला काजू

छोटी भूक भागवण्यासाठी चिप्स - कुरकुरे खाणं टाळा, घरीच करा कुरकुरीत मसाला काजू

Roasted Cashew nuts Recipe - Fried Masala Kaju चवीला भारी - आरोग्यासाठीही हेल्दी, एकदा करून तर पाहा - क्रिस्पी मसाला काजू..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2023 11:18 AM2023-08-17T11:18:51+5:302023-08-17T13:56:49+5:30

Roasted Cashew nuts Recipe - Fried Masala Kaju चवीला भारी - आरोग्यासाठीही हेल्दी, एकदा करून तर पाहा - क्रिस्पी मसाला काजू..

Roasted Cashew nuts Recipe - Fried Masala Kaju | छोटी भूक भागवण्यासाठी चिप्स - कुरकुरे खाणं टाळा, घरीच करा कुरकुरीत मसाला काजू

छोटी भूक भागवण्यासाठी चिप्स - कुरकुरे खाणं टाळा, घरीच करा कुरकुरीत मसाला काजू

कोकणचा मेवा अर्थात काजू सर्वत्र प्रसिद्ध आहे. नियमित काजू खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात विटॅमिन, प्रोटीन, फायबर, फॉस्फोरस, कॅल्शियम. सेलेनियम, आयरन, फायबर, फोलेट, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. काजूचे अनेक प्रकार केले जातात. काजू कोरमा, काजू मसाला, काजू हलवा, काही लोकं तर भाज्यांमध्ये काजूची पेस्ट मिक्स करतात. ज्यामुळे भाजीची चव आणखी वाढते. तर काही लोकं स्नॅक्स म्हणून मसाला काजू खातात.

हॉटेलमध्ये अनेक जण स्टार्टर म्हणून मसाला काजू ऑर्डर करतात. कुरकुरीत चटकदार ही रेसिपी चविष्ट लागते. पण घरी ट्राय केल्यावर ही रेसिपी हॉटेलस्टाईल तयार होत नाही. जर आपल्याला ही रेसिपी घरी ट्राय करायची असेल, तर स्टेप बाय स्टेप या रेसिपीला फॉलो करून पाहा(Roasted Cashew nuts Recipe - Fried Masala Kaju).

मसाला काजू करण्यासाठी लागणारं साहित्य

काजू

लाल तिखट

आमचूर पावडर

चाट मसाला

विकत कशाला आणायची आता घरीच करा झणझणीत शेजवान चटणी, करायला सोपी - टिकेल भरपूर

सैंधव मीठ

काळी मिरीपूड

कृती

सर्वप्रथम, पॅनमध्ये २ टेबलस्पून तूप घालून गरम करण्यासाठी ठेवा. तूप विरघळल्यानंतर त्यात २ कप काजू घालून भाजून घ्या. काजूला सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्या. काजू भाजून झाल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. त्यानंतर त्यात एक टेबलस्पून लाल तिखट, अर्धा टेबलस्पून आमचूर पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा सैंधव मीठ आणि चिमुटभर काळी मिरीपूड घालून चमच्याने मिक्स करा.

मुठभर कडीपत्त्याची ५ मिनिटांत करा चमचमीत चटणी, सोपी रेसिपी-चवीला भारी

तयार मसाला काजू एका प्लेटमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे मसाला काजू खाण्यासाठी रेडी. आपण तयार मसाला काजू एका हवाबंद डब्यात साठवून ठेऊ शकता. सायंकाळची छोटी भूक भागवण्यासाठी हा एक बेस्ट स्नॅक्स आहे. 

Web Title: Roasted Cashew nuts Recipe - Fried Masala Kaju

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.