Join us

ना गॅसचा वापर-ना जास्त वाटण घाटण, मिक्सरच्या भांड्यात पेरूच्या फोडी घालून करा चमचमीत चटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2024 11:45 IST

Ripe Guava Chutney Recipe (Amrood Ki Chutney) : नेहमी पेरूला मीठ-मसाला लावून का खाता? ट्राय करा सोपी ५ मिनिटात बनणारी चविष्ट चटणी..

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टर नेहमी फळं खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद असो किंवा मग पेरू. प्रत्येक फळ आपल्या पौष्टीक गुणधर्मामुळे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. भारतीय थाळीमध्ये फळांचा समावेश होतो. काही लोकं फळांचा वापर करून चमचमीत चटणी तयार करतात. भारतात कैरीपासून ते पेरूपर्यंत अनेक फळांची चटणी तयार करण्यात येते. पेरू खाण्याचे अनेक फायदे आहेत.

पेरू चिरून त्यावर मीठ, मसाला लावून आपण खातोच. पण आपण कधी पेरूची चटणी खाऊन पाहिली आहे का? बरेच जण पेरूची चटणी भाजून, किंवा फोडणी देऊन तयार करतात (Cooking Tips). पण गॅसचा वापर न करताही आपण पेरूची चविष्ट चटणी (Peruchi Chutney) तयार करू शकता. पेरुला फक्त मीठ-मसाला लावून खायचं नसेल तर, एकदा त्याची चटणी करून पाहा. तोंडी लावण्यासाठी ही चटणी चवीला तर भन्नाट लागतेच, शिवाय बनवायलाही सोपी आहे(Ripe Guava Chutney Recipe Amrood Ki Chutney).

पेरुची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

पेरू

कोथिंबीर

आलं

सैंधव मीठ

हिरवी-लाल की पिवळी? कोणती ढोबळी मिरची तब्येतीसाठी ठरते वरदान, वाचा रंगात दडलेलं सिक्रेट

हिरवी मिरची

जिरं पावडर

मीठ

काळी मिरी

लिंबाचा रस

कृती

दिल्लीचा फेमस राम लड्डू करण्याची ही घ्या चटकदार रेसिपी, अब दिल्ली दूर नहीं..

सर्वप्रथम, पेरू स्वच्छ धुवून घ्या. मधोमध काप करून, त्यातील बिया चमच्याने काढून घ्या. पेरू चिरून घ्या. मिक्सरच्या भांड्यात पेरूच्या फोडी, नंतर त्यात कोथिंबीर, आल्याचा एक तुकडा, एक चमचा सैंधव मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, एक चमचा जिरं पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि एक टेबलस्पून लिंबाचा रस घालून वाटून घ्या. तयार चटणी एका बाऊलमध्ये काढून घ्या. किंवा हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवा. अशा प्रकारे पेरूची चटकदार चटणी खाण्यासाठी रेडी. हवं असल्यास आपण या चटणीला फोडणी देखील देऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स