Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यात पालेभाज्या धुण्याची पाहा योग्य पद्धत, पालेभाज्या चांगल्या-पण पावसाळ्यात बिघडू शकतं पोट

पावसाळ्यात पालेभाज्या धुण्याची पाहा योग्य पद्धत, पालेभाज्या चांगल्या-पण पावसाळ्यात बिघडू शकतं पोट

How to clean vegetables in Monsoon  : या दिवसात फळं किंवा पालेभाज्यांवर कीटकनाशकांचे फरावे मारले जातात. रसायनिक खतांचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे कीटकनाशक औषधांमुळे अधिक नुकसानकारक होतात. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:48 IST2025-05-22T11:35:31+5:302025-05-22T13:48:45+5:30

How to clean vegetables in Monsoon  : या दिवसात फळं किंवा पालेभाज्यांवर कीटकनाशकांचे फरावे मारले जातात. रसायनिक खतांचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे कीटकनाशक औषधांमुळे अधिक नुकसानकारक होतात. 

Right way to clean vegetables in monsoon days | पावसाळ्यात पालेभाज्या धुण्याची पाहा योग्य पद्धत, पालेभाज्या चांगल्या-पण पावसाळ्यात बिघडू शकतं पोट

पावसाळ्यात पालेभाज्या धुण्याची पाहा योग्य पद्धत, पालेभाज्या चांगल्या-पण पावसाळ्यात बिघडू शकतं पोट

Right way to clean vegetables in Monsoon  :  पावसाला सुरूवात होताच वातावरण बदल आणि दूषित पाण्यामुळे वेगवेगळे इन्फेक्शन आणि आजारांचा धोका वाढत असतो. पावसाच्या दिवसांमध्ये पालेभाज्या खाताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसात फळं किंवा पालेभाज्यांवर कीटकनाशकांचे फरावे मारले जातात. रसायनिक खतांचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे कीटकनाशक औषधांमुळे अधिक नुकसानकारक होतात.

अनेकदा भाज्या किंवा फळांवर अनेक केमिकल्स वापरले जातात. ज्यामुळे वेगवेगळ्या आजारांसोबतच कॅन्सरचा धोकाही असतो. त्यामुळे पावसाळ्यात भाज्या किंवा फळं फक्त पाण्यानं धुवून चालत नाही. भाज्या स्वच्छ करताना खूप काळजी घ्यावी लागते. भाज्या कशा स्वच्छ कराव्या हे आज आपण जाणून घेणार आहोत.

पावसाळ्यात भाज्या धुण्याची योग्य पद्धत

पावसाळ्यात आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फळं आणि भाज्या केवळ पाण्यानं स्वच्छ करून चालत नाही. असं करणं महागात पडू शकतं. पाण्यानं फळं आणि भाज्यांवरील धूळ-माती तर स्वच्छ होते, पण पेस्टीसाइड आणि कीटकनाशक औषधांचा प्रभाव पूर्णपणे दूर होत नाही. एक्सपर्ट सांगतात की, पेस्टीसाइड योग्यप्रकारे स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरावा. बेकिंग सोडा पाण्यात मिश्रित करून भाजी किंवा फळं स्वच्छ करणे अधिक चांगलं ठरेल.

रिसर्च काय सांगतो?

जर्नल ऑफ अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅन्ड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, बेकिंग सोड्याचा वापर करुन कीटकनाशक आणि पेस्टीसाइड्सचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. बेकिंग सोडा पाण्यात टाकून त्यात फळं आणि भाज्या एक मिनिटांसाठी ठेवल्या तर पेस्टीसाइड्सचा प्रभाव दूर होतो. जर जास्त पेस्टीसाइड्सचा उपयोग केला गेला असेल तर पाणी बेकिंग सोड्यामध्ये फळं आणि भाज्या १० ते १५ मिनिटांसाठी भिजवून ठेवाव्यात. 

बेकिंग सोडा एकप्रकारे सोडियम बायकार्बोनेट असतं, जे कीटकनाशक औषधे आणि पेस्टीसाइड्सला स्वच्छ करण्याच्या कामात येतं. पेस्टीसाइड्सचं सर्वात प्रचलित रुप थायबेंडाजोल आणि फॉस्फेट याने सहजपणे स्वच्छ करता येतं. पण काही फळांच्या आता फळं लवकर पिकण्यासाठी किंवा रोग नष्ट करण्यासाठी कीटकनाशक औषध इंजेक्ट केलं जातं. हे कीटकनाशक बेकिंग सोड्याच्या मदतीने साफ केलं जाऊ शकत नाही. 

Web Title: Right way to clean vegetables in monsoon days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.