Join us

दुपारच्या जेवणानंतर आंबे खावेत की नाही? डायटिशिअननं सांगितली आंबे खाण्याची योग्य वेळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 10:45 IST

Right right to eat mango : जर तुम्ही चुकीच्या वेळी आंबे खाल्ले तर आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. हा दावा आमचा नाही तर डॉक्टरांचा आहे.

Summer Diet: उन्हाळ्यात रसाळ आणि गोड-आंबट आंब्यांचा आनंद सगळेच घेतात. कुणी आंबे चोखून खातात तर कुणी त्यांचा रस बनवतात. आंबा हा फळांचा राजा आहे. यावरूनच त्याचं महत्व कळतं. लोक आंब्याच्या सीझनची आतुरतेने वाट बघत असतात. या दिवसांमध्ये लोक रोज आंबे खातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आंबे खाण्याची वेळही फार महत्वाची असते. जर तुम्ही चुकीच्या वेळी आंबे खाल्ले तर आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. हा दावा आमचा नाही तर डॉक्टरांचा आहे.

बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की, दुपारच्या जेवणावेळी आंबे खावेत की नाही. आंबे खाल्ले जर जड तर होणार नाही ना? अशात डायटिशिअन लवलीन कौर यांनी याबाबत माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दुपारच्या जेवणावेळी आंबा खावा की नाही याबाबत आणि आंबा खाण्याची योग्य पद्धत याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.

दुपारी आंबा खावा की नाही?

डायटिशिअन लवलीन कौर म्हणाल्या की, अनेकांना असं वाटत असतं की, दुपारच्या जेवणावेळी आंबा खाल्ला तर फर्मेंटेशन होतं. शुगर वाढते आणि पोटही फुगतं. पण असं अजिबात नाहीये. तुम्ही दुपारच्या जेवणावेळी आंबा खाऊ शकता.

सामान्यपणे फळं खाण्याची योग्य वेळ सकाळची मानली जाते. सकाळी उपाशीपोटी फळं खाणं आरोग्यासाठी योग्य मानलं जातं. फळं जर ड्रायफ्रूट्ससोबत खाल्ले तर यांमधील कार्बोहायड्रेट लोड डिस्ट्रिब्यूट होतं आणि ब्लड शुगर स्पाइक होत नाही. जर हेल्दीमध्ये आणि बॅलन्स्ड आहार घेत असाल ज्यात फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण अधिक असेल तर त्यासोबत फळं खाल्ले जाऊ शकतात. डायटिशिअन सांगतात की, शुगर क्रेविंग्स दूर करण्यासाठी बाहेरील गोष्टी खाण्याऐवजी दुपारच्या जेवणावेळी आंबे खाऊ शकता.

आंबे खाण्याचे फायदे

- आंब्यांमध्ये व्हिटामान ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असतात. तसेच यात पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमही भरपूर असतं. इम्यूनिटी मजबूत करण्यासाठी आंबे फायदेशीर ठरतात.

- आंबे पचन तंत्र मजबूत ठेवण्यासाठी देखील खूप फायदेशीर असतात. आंबे खाऊन ब्लोटिंग, अपचन आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात.

- आंबे हृदय निरोगी ठेवण्यासाठी देखील मदत करतात. यात आढळणारं फायबर, पोटॅशिअम आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स हृदय निरोगी ठेवतात.

- तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर आहारात आंब्यांचा समावेश करू शकता. 

- आंब्यांमध्ये असेही अनेक तत्व असतात जे बॉडी डिटॉक्स करण्यास मदत करतात. शरीरातील विषारी तत्व यानं बाहेर पडतात.

टॅग्स :अन्नआंबाहेल्थ टिप्स