Join us

व्हेज कुर्मा करताना भाज्या जास्त शिजतात? वाटण चुकतं? १ ट्रिक; हॉटेलस्टाईल बनेल कुर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2024 10:00 IST

Restaurant style South Indian Vegetable kuruma for chapati : भाऊबीजनिमित्त घरीच बनवा हॉटेलस्टाईल चमचमीत व्हेज कुर्मा

हिवाळ्यात (Winter Season) बाजारात विविध प्रकारच्या भाज्या मिळतात. हिरव्यागार भाज्यांनी (Vegetables) मार्केट सजतात. या भाज्यांचा वापर करून आपण विविध प्रकारच्या पदार्थ बनवू शकतो (Food). विविध प्रकारच्या भाज्यांचा वापर करून आपण व्हेज पुलाव, कटलेट्स, किंवा कुर्माही बनवू शकतो. सणवार जवळ आल्यानंतर आपण व्हेज कुर्मा बनवून खातो.

व्हेज कुर्मा बनवणं वाटतं तशी सोपी रेसिपी नाही. बऱ्याचदा भाज्या जास्त प्रमाणात शिजतात. किंवा मसाल्याचे प्रमाण चुकते. ज्यामुळे घरात हॉटेलस्टाईल कुर्मा बनत नाही. जर आपल्याला घरात हॉटेलस्टाईल कुर्मा बनवायचा असेल तर, या रेसिपीला फॉलो करा. एकदम परफेक्ट हॉटेलस्टाईल भाज्यांचा चविष्ट कुर्मा तयार होईल(Restaurant style South Indian Vegetable kuruma for chapati).

चमचमीत व्हेज कुर्मा करण्यासाठी लागणरं साहित्य

फ्लॉवर

बटाटे

फरसबी

गाजर

मटार

ओलं खोबरं

सुक्या लाल मिरच्या

खडा मसाला

कांदा

दिवाळीची इतकी साफसफाई केली तरी घरात झुरळं दिसतातच? पाण्यात ३ गोष्टी घालून लादी पुसा

लाल तिखट

धणे पूड

मीठ

कृती

सर्वात आधी प्रेशर कुकर घ्या. त्यात पाणी घाला. नंतर कुकरच्या डब्यामध्ये सगळ्या भाज्या चिरून धुवून घाला. नंतर त्यात ग्लास पाणी घाला, आणि प्रेशर कुकरचं झाकण लावा. प्रेशर कुकर गॅसवर ठेवा. मिडीयम फ्लेमवर गॅस ठेवा. एक शिटीनंतर गॅस बंद करा.

आता मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचं किस, काळी मिरी, सुक्या लाल मिरच्या, दालचिनी घाला. आणि त्यात थोडं पाणी घाला. आणि याची स्मूथ पेस्ट तयार करा. वाटण तयार झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या.

दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात ४ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात खडा मसाला घाला. मसाले भाजून घेतल्यानंतर त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालून भाजून घ्या. कांद्याला लालसर रंग आल्यानंतर  त्यात तयार वाटण घालून मिक्स करा. नंतर त्यात धणे पूड आणि २ चमचे लाल तिखट घालून मिक्स करा.

हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी

वाटण २ मिनिटांसाठी भाजून घ्या. वाटणाला तेल सुटल्यानंतर त्यात शिजलेल्या भाज्या घालून मिक्स करा. नंतर त्यात एक वाटी काजू, चवीनुसार मीठ आणि एक वाटी पाणी घालून मिक्स करा. ५ मिनिटांसाठी मध्यम आचेवर भाजी शिजवून घ्या. अशा प्रकारे चमचमीत व्हेज कुर्मा खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स