'खीर' हा भारतीय गोडाधोडाच्या पदार्थांमधील सगळ्यांत लोकप्रिय आणि सगळ्यांच्याच आवडता पदार्थ. सणवार असो, नैवेद्य असो किंवा कोणता खास प्रसंग जेवणाच्या ताटात (How To Remove Burnt Smell From Kheer) गोडाच्या पदार्थांत 'खीर' कायम असतेच. सध्या श्रावण महिना सुरु आहे या महिन्यांत येण्याऱ्या सणावाराला हमखास आपण खीर करतोच. खिरी सारखा पदार्थ तयार करताना खूप बारकाईने लक्ष देऊन, काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. खीर तयार करताना काहीवेळा गडबडीत ती करपते किंवा जळते(Remove Burnt Smell From Kheer).
अनेकदा खीर करपून चक्क भांड्याच्या तळाशी देखील चिकटून बसते. खीर करपल्यानंतर त्याला एक प्रकारचा असा करपल्याचा जळका वास येतो. इतकंच नाही तर खीर करपल्यानंतर तिची गोड - सुमधुर चव बिघडून ती कडू लागते. अशी जळकी, करपलेली खीर खाण्याची इच्छाच होत नाही. यामुळे खीर आणि ती तयार करण्यासाठी घेतलेली मेहेनत दोन्ही वाया जातात. यासाठीच, घाईगडबडीत खीर तयार करताना ती करपली किंवा त्याला जळका वास येऊ लागला तर अशी खीर आपण चक्क वाया गेली (easy way to remove burnt taste from kheer) समजून फेकून देतो. परंतु, अशावेळी ती खीर फेकून (kheer burnt smell removal tips) देण्याऐवजी काही सोप्या युक्त्या वापरून आपण करपलेला वास पूर्णपणे काढून टाकू शकता. काही खास टिप्स आहेत ज्याच्या मदतीने आपण करपलेल्या खिरीचा वास सहजपणे दूर करु शकतो. काही खास टिप्स वापरून आपण खीर पुन्हा एकदा खाण्यायोग्य करू शकता आणि तुमची मेहनतही वाया जाणार नाही.
करपलेल्या - जळक्या खिरीचा वास घालवण्यासाठी खास उपाय...
१. खीर लागेच दुसऱ्या भांड्यात काढा :- खीर जळल्यावर लगेच खिरीचा चांगला असलेला वरचा थर दुसऱ्या स्वच्छ भांड्यात काढा, जेणेकरून जळलेला भाग त्यात मिसळणार नाही.
२. ब्रेडचा तुकडा टाका :- खीर हलकी गरम असतानाच ब्रेड स्लाईसचे काही तुकडे त्यात घालून काही मिनिटे ठेवा, त्यामुळे करपल्याचा वास ब्रेड स्लाईस शोषला घेतो, आणि खिरीचा करपलेला - जळका वास कमी होतो.
ना रवी-ना भांडं-मिक्सरमध्ये काढा लोण्याचा गोळा! रवाळ तूप करण्याची पाहा ही भन्नाट ट्रिक...
३. वेलची पूड घाला :- थोडीशी वेलची पूड करपलेल्या खिरीत घातल्याने जळका वास कमी होऊन खीर छान सुगंधी होते आणि करपल्याची चव कमी होते.
४. ड्रायफ्रूट्सचा वापर :- बदाम, काजू, पिस्ते हलके भाजून खिरीत घातल्याने चव छान होते आणि जळल्याचा फ्लेवर कमी होतो.
तोंडात टाकताच विरघळणारे कापसाहून हलके गुलाबजाम करा घरीच! ६ टिप्स-विकतचे गुलाबजाम विसरुन जाल...
५. थोडं कंडेन्स्ड मिल्क घाला :- थोडं कंडेन्स्ड मिल्क खिरीत घातल्याने खिरीची गोडी व टेक्श्चर सुधारते आणि करपल्याची चव बऱ्यापैकी कमी होते.
६. व्हॅनिला इसेंस वापरा :- काही थेंब व्हॅनिला इसेंस टाकल्याने खिरीचा जळका वास कमी करता येतो.