आजकाल अनेक गृहिणी कामाच्या गडबडीत किंवा वर्किंग वूमन असल्यामुळे सकाळीच दोन वेळचं जेवण एकदम तयार करून ठेवतात. भाजी, आमटी सगळं व्यवस्थित होतं, पण एक समस्या हमखास आपल्यापैकी अनेकींना सतावते. सकाळी केलेल्या चपात्या दुपार किंवा संध्याकाळपर्यंत सुकतात, कडक होतात, विशेषतः हिवाळ्यात... अशा कोरड्या चपात्या खाण्याची मजाही जाते...(trick to reheat rotis in pressure cooker).
सकाळच्या घाईगडबडीत डबा आणि दुपारचे जेवण तयार करताना अनेकदा रात्रीच्या जेवणाचीही सोय म्हणून जास्तीच्या चपात्या एकदाच तयार करुन ठेवल्या जातात. परंतु, रात्री जेवायला बसल्यावर लक्षात येते की सकाळी मऊ असलेल्या चपात्या आता कोरड्या आणि कडक झाल्या आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत तर ही समस्या अधिकच जाणवते. वातड झालेली चपाती खाणे कोणालाही आवडत नाही. मग काय करावे? चपात्या पुन्हा फेकून द्यायच्या की तशाच कडक खायच्या? काळजी करू नका! काही सोप्या आणि भन्नाट ट्रिक्स वापरून आपण सकाळी केलेल्या चपात्या काही(reheat chapati in pressure cooker in 5 minutes) मिनिटांत पुन्हा ताज्या, गरम आणि कापसासारख्या मऊसूत करू शकता.
शिळ्या चपात्या पुन्हा गरम आणि मऊ करण्याची भन्नाट ट्रिक्स...
१. चपात्या कापडात गुंडाळा :- तुम्हाला जेवढ्या चपात्या गरम करायच्या आहेत, त्या सर्व एका स्वच्छ, सुती कापडात व्यवस्थित गुंडाळून घ्या. लक्षात ठेवा की कापड जास्त जाड नसावे आणि ते ओलेही नसावे. कापडात गुंडाळलेल्या चपात्या एका स्टीलच्या डब्यात ठेवा आणि डब्याचे झाकण व्यवस्थित बंद करा. कापडात गुंडाळल्यामुळे चपात्यांमधील ओलावा टिकून राहतो आणि वाफेवर गरम होताना त्या कडक होत नाहीत. ही पायरी सर्वात महत्त्वाची आहे.
२. चपात्या डब्यात ठेवा :- आता एक स्टीलचा डबा घ्या आणि कापडात गुंडाळलेल्या चपात्या त्यामध्ये ठेवा. डब्याचे झाकण व्यवस्थित बंद करा, जेणेकरून वाफ थेट चपात्यांवर पोहोचणार नाही आणि त्या ओल्या होणार नाहीत.
३. प्रेशर कुकर करा प्री - हिट :- कुकरमध्ये एक ग्लास पाणी ओता. चपात्यांचा डबा थेट पाण्यात बुडणार नाही याची काळजी घ्या; त्यासाठी खाली एक स्टँड किंवा रिंग ठेवा आणि त्यावर डबा ठेवा.
अस्सल गावरान पद्धतीची हिरव्या टोमॅटोची चटणी, भाजीची गरज नाही-पोळीभाकरीसोबत पोटभर जेवण...
४. कुकरमध्ये गरम करा :- कुकरचे झाकण बंद करा, पण शिट्टी लावू नका. गॅस सुरू करा आणि जोपर्यंत वाफेचा हलका आवाज येत नाही तोपर्यंत गरम होऊ द्या. जसे वाटेल की आता वाफ पूर्ण भरली आहे आणि शिट्टी वाजण्याची स्थिती आहे, तेव्हा लगेच गॅस बंद करा.
५. वाफेमध्ये राहू द्या :- गॅस बंद केल्यावर कुकर काही मिनिटे तसाच बंद राहू द्या, जेणेकरून आतील वाफेमुळे चपात्या चांगल्या गरम आणि मऊ होतील. कुकर थोडा थंड झाल्यावर झाकण उघडा आणि डबा योग्य ती काळजी घेऊन बाहेर काढा. तुमच्या चपात्या अगदी आताच पोळपाटावरून उतरवल्यासारख्या ताज्या आणि मऊ असतील.
शिळ्या चपात्या गरम करण्याचा हा कोणता उपाय...
खरे तर, वाफेवर गरम केल्यामुळे चपात्या अगदी ताज्या बनवल्यासारख्या सॉफ्ट आणि मऊ राहतात. तसेच, यामुळे चपातीची मूळ चव आणि सुगंध देखील टिकून राहतो. तव्यावर पुन्हा गरम करणे किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्यापेक्षा ही पद्धत अधिक आरोग्यदायी (Healthy) आणि स्वच्छ (Hygienic) मानली जाते.
अस्सल खान्देशी उडीद वडे, चव झणझणीत अशी की खाताच म्हणाल वाढा आणखी! पारंपरिक चवीचा बेत...
अशा प्रकारे तुमच्या चपात्या पूर्णपणे गरम आणि मऊ होतील - अगदी आताच बनवलेल्या ताज्या चपात्यांसारख्या! त्या अजिबात सुकणार नाहीत किंवा कडकही होणार नाहीत. हिवाळ्यात हा उपाय फक्त तुमचा वेळच वाचवणार नाही, तर तुम्हाला मेहनतही कमी करावी लागेल.
इतरही उपाय आहेत फायदेशीर...
१. पाण्याची वाफ द्या :- ही सर्वात सोपी पद्धत आहे. एका मोठ्या पातेल्यात थोडे पाणी गरम करायला ठेवा. पाणी उकळू लागल्यावर त्यावर एक चाळणी ठेवा आणि त्यात चपात्या ठेवा. वरून झाकण ठेवून फक्त १ ते २ मिनिटे वाफ द्या. वाफेमुळे चपातीतील ओलावा परत येतो आणि ती एकदम मऊ होते.
२. ओल्या कपड्याचा वापर :- चपाती गरम करण्यापूर्वी एका स्वच्छ सुती कपड्याचा हात थोडा ओला करून घ्या. तो कपडा चपात्यांभोवती गुंडाळा आणि मग तव्यावर मंद आचेवर गरम करा. यामुळे चपाती सुकणार नाही.
३. मायक्रोवेव्हची योग्य पद्धत :- जर तुम्ही मायक्रोवेव्ह वापरत असाल, तर चपाती थेट गरम करू नका. चपातीसोबत एका छोट्या पेल्यात थोडे पाणी मायक्रोवेव्हमध्ये शेजारी ठेवा. ३० सेकंद गरम करा. पाण्यातील ओलाव्यामुळे चपाती मऊ राहील.
४. गरम पाण्याचा हात लावणे :- जर चपाती खूपच कडक झाली असेल, तर थोडा कोमट पाण्याचा हात चपातीला लावून ती गरम तव्यावर दोन्ही बाजूने १० ते २० सेकंद परतावी.
Web Summary : Tired of dry rotis? Reheat them in a pressure cooker! Wrap in cloth, steam in a steel container inside the cooker (without the whistle). Enjoy soft, fresh-tasting rotis. Other methods include steaming, damp cloth, or microwave with water.
Web Summary : क्या आप सूखी रोटियों से परेशान हैं? उन्हें प्रेशर कुकर में गरम करें! कपड़े में लपेटें, कुकर के अंदर स्टील के कंटेनर में भाप दें (सीटी के बिना)। नरम, ताज़ी रोटियों का आनंद लें। अन्य तरीकों में भाप देना, नम कपड़ा या पानी के साथ माइक्रोवेव शामिल हैं।