आपण जवळपास सगळे पदार्थ घरी तयार करू शकतो. सामग्री विकत आणायची आणि मग विविध पदार्थ घरीच तयार करायचे. (Red-green-yellow Tutti Frutti - very easy to prepare at home.. see the recipe)म्हणजे विकतच्या पदार्थांपेक्षा चांगल्या दर्जाचे पदार्थ तयार करता येतात. खास म्हणजे लहान मुलांना खायला द्यायचे पदार्थ आपण शक्यतो घरातच तयार करतो. त्यांना बाहेरचे खायची सवय लागली की मग घरचे जेवण रुचकर लागत नाही. (Red-green-yellow Tutti Frutti - very easy to prepare at home.. see the recipe)जर घरीच विकतसारखे तयार करता येत असेल तर प्राधान्य होममेड पदार्थांनाच द्यायला हवे.
आपण केक घरी तयार करतो. फालुदाही करतो. मात्र त्यावर टाकायला तुटीफ्रुटी विकत आणतो. ती छान आंबट गोड लागते. लहान मुलांनाही ती नुसतीच गोळी सारखी खायला आवडते. तुटीफ्रुटी मस्त रंगीबेरंगी असते. त्यामुळे दिसताना फार आकर्षक असते. त्यामुळे ती खाण्यासाठी मन ललसावते. लहान मुलेच नाही तर मोठ्यांनाही तुटीफ्रुटी आवडते. ती रंगीबेरंगी असते कारण त्यामध्ये रंग घातलेला असतो. आता तो रंग कोणत्या दर्जाचा आहे, आपल्याला माहिती नसते. पण तुम्हाला माहिती आहे का? ही तुटीफ्रुटी कशापासून तयार केली जाते? असा पदार्थ आहे जो आपण खराब म्हणून टाकून देतो. घरी ही तुटीफ्रुटी तयार करणे अगदीच सोपे आहे.
साहित्य
कलिंगडाची सालं, साखर, पाणी, फुड कलर
कृती
१. कलिंगडाच्या सालांचा जो पांढरा भाग असतो तेवढाच आपल्याला वापरायचा आहे. कलिंगडाची हिरवी साले काढून घ्या. लाल भागही काढून घ्या. पांढऱ्या भागाचे बारीक तुकडे करून घ्या.
२. एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवा. त्या पाण्यामध्ये कापलेले सालाचे तुकडे टाका. झाकण ठेवा आणि उकळून घ्या. सालाचे तुकडे जरा शिजले की थोडे पारदर्शक होतील. ते चांगले शिजले की मग गॅस बंद करा.
३.एका पातेल्यामध्ये साखरेचा पाक तयार करून घ्या. एक तारी पाक तयार करा. पाक छान तयार झाल्यावर त्यामध्ये उकळलेले सालाचे तुकडे घाला. पाकात टाकण्याआधी ते जरा कोरडे करून घ्या.
४. जरा ५ ते १० मिनिटे पाकामध्ये तुकडे उकळले की मग गॅस बंद करा. तुम्हाला जो रंग वापरायचा आहे तो त्यामध्ये टाका. आणि उन्हात ठेऊन ते तुकडे वाळवून घ्या.