lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > केवळ २ मिनिटात करा चटपटीत हेल्दी मसाला पोळी रोल... मुलेही खूश आणि मम्मीही खूश !!

केवळ २ मिनिटात करा चटपटीत हेल्दी मसाला पोळी रोल... मुलेही खूश आणि मम्मीही खूश !!

सध्या मुले घरातच असल्यामुळे त्यांना सायंकाळच्या सुमारास किंवा दिवसातून कधीही काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. मग रोजच मुलांना असे काय यम्मी- यम्मी करून द्यावे, असा प्रश्न त्यांच्या  आईला कायम पडलेला असतो. यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे केवळ २ मिनिटात तयार होणारा मसाला पोळी रोल. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 12:53 PM2021-06-25T12:53:38+5:302021-06-25T13:04:08+5:30

सध्या मुले घरातच असल्यामुळे त्यांना सायंकाळच्या सुमारास किंवा दिवसातून कधीही काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. मग रोजच मुलांना असे काय यम्मी- यम्मी करून द्यावे, असा प्रश्न त्यांच्या  आईला कायम पडलेला असतो. यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे केवळ २ मिनिटात तयार होणारा मसाला पोळी रोल. 

Recipe of tasty, yummy and healthy masala chapati role | केवळ २ मिनिटात करा चटपटीत हेल्दी मसाला पोळी रोल... मुलेही खूश आणि मम्मीही खूश !!

केवळ २ मिनिटात करा चटपटीत हेल्दी मसाला पोळी रोल... मुलेही खूश आणि मम्मीही खूश !!

Highlightsशिळ्या किंवा ताज्या पोळ्या वापरूनही मसाला पोळी रोल करता येतो.रात्री जर सकाळच्या भरपूर पोळ्या उरल्या असतील आणि विशेष भूक नसेल तर चटणी पोळी, लाेणचे पोळी असे काहीतरी खाण्यापेक्षा मसाला पोळी रोल करूनही खाता येते.यामध्ये आवडीनुसार कच्च्या भाज्या घालता येत असल्याने मुले भाज्या खात नाहीत, ही बहुतांश आईंची तक्रारही दुर होऊ शकते.

'आई.... भूक लागली......पण काहीतरी मस्त कर हं....तेच ते घरातलं काहीतरी नको..' अशी मुलांची हाक दिवसातून एकदा तरी कानावर येतेच येते. घरात चिवडा, लाडू, स्वयंपाक असं खूप काही तयार असतं, पण मुलांना यातील काहीच नको असतं. याशिवाय दुसरे म्हणजे मुलांसाठी काहीही करताना ते कितपत हेल्दी आहे, असा विचारही त्यांच्या आई हमखास करतातच. म्हणूनच मसाला पोळी रोल ही अतिशय सोपी पण तेवढीच यम्मी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. पोळ्या किंवा चपाती वापरून हा पदार्थ तयार करण्यात येत असल्याने तो पौष्टिक तर असतोच पण त्यामुळे पोटही व्यवस्थित भरते. म्हणूनच नाष्टा म्हणूनही हा पदार्थ करायला काहीच हरकत नाही. 

 

मसाला पोळी रोलसाठी लागणारे साहित्य
पोळ्या, तूप, टोमॅटो सॉस, बारीक शेव, तिखट, चाट मसाला, कांदा आणि तुम्हाला सिमला मिरची, कोबी अशा ज्या भाज्या कच्च्या खाणं आवडत असेल त्या सगळ्या भाज्या. 

कृती
१. मसाला पोळी रोल करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर तवा तापत ठेवा. 
२. तवा थोडा गरम झाला की त्यावर तूप सोडा आणि तयार असलेली पोळी त्याच्यावर टाकून खालून, वरून खमंग भाजून घ्या.
३. यानंतर पोळी तव्यावरच ठेवून पोळीच्या वरच्या बाजूवर सगळीकडे टोमॅटो सॉस व्यवस्थित लावून घ्या. 
४. आवडीनुसार तिखट टाकून ते ही सगळीकडे नीट पसरवून घ्या.
५. यानंतर बारीक चिरलेला कांदा पोळीवर टाका.


६. सिमला मिरची, कोबी, गाजर किंवा ज्या भाज्या कच्च्या खाता येतात, अशा कोणत्याही भाज्या तुमच्या आवडीनुसार अगदी बारीक चिरून पोळीवर टाका. या पदार्थाला आणखी हेल्दी बनविण्यासाठी पनीरही टाकू शकता. 
७. भाज्या टाकल्यानंतर बारीक शेव टाका आणि त्यानंतर चाट मसाला टाका.
८. आता सगळ्यात शेवटी यावर चीज किसून टाका आणि रोल करून मुलांना गरमागरम सर्व्ह करा.

 

ही काळजी घ्या...
ही सगळी रेसिपी आपल्याला तव्याखाली गॅस चालू असतानाच करायची आहे. त्यामुळे गॅस अगदी मंद असला पाहिजे. जेणेकरून पोळीवर सगळे पदार्थ टाकून होईपर्यंत खालून ती पोळी जळणार नाही. शिवाय सगळ्या भाज्या चिरून तयार असल्यावरच रेसिपी करायला घ्यावी, म्हणजे पटापट रोल तयार करता येतील. 
 

Web Title: Recipe of tasty, yummy and healthy masala chapati role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.