गोड पदार्थ तयार करायचे म्हटले की, झटपट तयार करता येणाऱ्या काही मोजक्याच रेसिपी आहेत. खीर असेल किंवा मग शिरा असेल. (Recipe for making Mysore in just 20 minutes, only 4 ingredients needed)पटकन तयार करायचं म्हणजे की हेच सुचतं. पण अजूनही काही झटपट तयार होणाऱ्या रेसिपी आहेत. त्यापैकीच एक म्हणजे तुपातील मैसूरपाक. मैसूरपाकामध्ये दोन प्रकार असतात. एक असतो जाळीचा जो जरासा कडक असतो. (Recipe for making Mysore in just 20 minutes, only 4 ingredients needed)आणि दुसरा असतो तो म्हणजे मऊ असा. मऊ मैसूरपाक जीभेवर ठेवताच विरघळून जातो.
मऊ किंवा तुपातला मैसूरपाक तयार करायला मोजून २० मिनिटे लागतात. १० मिनिटे तयार करायला आणि १० मिनिटे सेट होण्यासाठी. (Recipe for making Mysore in just 20 minutes, only 4 ingredients needed)अगदीच सोपा आहे. फक्त तूप जरा जास्त वापरावे लागते. तुपाशिवाय मैसूरपाकाला मजा नाही.
साहित्य
बेसन, तूप, साखर, पाणी
प्रमाण
प्रमाण घेताना जर १ वाटी बेसन वापरत असाल, तर १ वाटी तूप लागेल. जास्तही वापरू शकता. पण कमी नाही. १ वाटी साखर घेतली तर, पाकासाठी त्यात अर्धी वाटी पाणी घालायचे.
कृती
१. बेसन व्यवस्थित चाळून घ्या. नंतर ते परतून घ्या. तेल-तूप काहीही न वापरता परतायचे. अगदी मंद आचेवर परतायचे. २ ते ३ मिनिट परतले तरी पुरेसे आहे. बेसनाचा रंग थोडासा गडद झाला की मग गॅस बंद करा.
२. बेसन पुन्हा एकदा चाळून घ्या. त्यात जर गुठळ्या असतील तर त्या फोडून घ्या. आपल्याला पीठ एकदम मऊ हवे आहे.
३. त्या पीठामध्ये १ वाटी गरम तूप ओता. तूप व्यवस्थित पातळ हवे. बेसन आणि तुपाचे मिश्रण एकजीव करून घ्या. त्यात अजिबात गुठळ्या राहू देऊ नका.
४. एकीकडे साखरेचा पाक करत ठेवायचा. साखर आणि पाणी एकत्र करून व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. एक तारी पाक आपल्याला तयार करायचा आहे.
५. पाक छान तयार झाला की, गॅस एकदम कमी ठेऊन त्यात बेसन व तुपाचे मिश्रण हळूहळू ओतायचे. ओतताना एका हाताने ते ढवळत राहायचे.
६. पूर्ण ओतून झाल्यावर ५ मिनिटे सलग ढवळत राहायचे थांबायचे नाही. मिश्रण जरा घट्ट झाले की, एका खोलगट ताटाला तूप लावायचे आणि त्या ताटामध्ये मिश्रण ओतायचे. थोड्याच वेळात ते सेट होते.
७. सुरीने किंवा उलथण्याने तुकडे करून घ्यायचे.