प्रेशर कुकर प्रत्येक स्वयंपाकघराचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, कारण तो अन्न लवकर आणि सहज शिजवण्यास मदत करतो. पण प्रेशर कुकरमध्ये काही पदार्थ शिजवणं आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. असे अनेक अन्नपदार्थ आहेत जे कुकरमध्ये शिजवल्यावर त्यातील आवश्यक पोषक घटक जातात किंवा आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. प्रेशर कुकरमध्ये शिजवण्यापासून टाळावे अशा अन्नपदार्थांबद्दल जाणून घेऊया...
कोणतेही दुग्धजन्य पदार्थ प्रेशर कुकरमध्ये शिजवू नयेत. उच्च तापमानात, दूध लवकर फाटू शकतं आणि त्यातील पोषक घटक नष्ट होऊ शकतात. शिवाय, ते कुकरला चिकटतं, ज्यामुळे नंतर कुकर स्वच्छ करणं अवघड होऊन जातं. पालक, मेथी आयासारख्या हिरव्या पालेभाज्या कुकरमध्ये शिजवल्याने त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात.
नायट्रेटमध्ये याचं रुपांतर होऊ शकतं, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरेल. प्रेशर कुकरमध्ये पास्ता आणि नूडल्स शिजवल्याने ते खूपच जास्च मऊ आणि चिकट होतात. त्यामुळे ते वेगळ्या पॅनमध्ये आधी उकडून किंवा वाफवून घ्या. कुकरमध्ये अंडी उकडवू नका. त्यामुळे ती फुटू शकतात आणि त्यातील पोषक घटक देखील कमी होतात.
टोमॅटो, चिंच, दही आणि लिंबू यांसारखे आंबट पदार्थ कुकरमध्ये शिजवल्याने त्यातील आम्लयुक्त गुणधर्म कुकरच्या धातूशी रिएक्ट करू शकतात. यामुळे, हानिकारक घटक अन्नात विरघळू शकतात, जे आरोग्यास हानी पोहोचवतात. कुकरमध्ये मासे शिजवल्याने ते खूप लवकर जास्त शिजतात आणि त्यांची चव आणि टेक्सचर खराब होतं.