Join us

ताज्या करकरीत कैऱ्यांचं करा आंबटगोड झटपट लोणचं, वरण-भात-लोणचं-जेवा मनसाेक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2023 15:40 IST

Raw Mango Kairi Instant Pickle Recipe : उन्हाळ्यात तोंडी लावण्यासाठी चविष्ट रेसिपी...

उन्हाळ्याच्या दिवसांत तोंडाची चव जाते. दुपारच्या रणरणत्या उन्हात डब्यातली पोळी-भाजीही अनेकदा नको होते. उकाड्याने तोंडाला सतत कोरड पडत असल्याने पाणी पाणी होत राहतं. अशावेळी आपण एकतर सतत घटाघटा पाणी पित राहतो नाहीतर सरबत, आईस्क्रीम, कोल्ड्रींक असे काही ना काही घेतो. त्यामुळे तर भूक आणखीनच कमी होते. म्हणूनच उन्हाळ्यात आंबा, कैरी यांचे पदार्थ आवर्जून केले जातात. वाळवण किंवा तोंडी लावायला ताटात काही असेल तर चार घास जास्त जातात. कैरीपासून केला जाणारा चुंदा, मेथांबा, साखरांबा, गुळांबा, कैरीचं वर्षभर टिकणारं लोणचं, आंबट-गोड ताजं लोणचं असे प्रकार केले जातात. कमीत कमी पदार्थांमध्ये तोंडी लावायला झटपट होणारं आणि जेवणाची लज्जत वाढवणारं हे कैरीचं ताजं लोणचं कसं करायचं पाहूया (Raw Mango Kairi Instant Pickle Recipe).  

साहित्य -

१. कैरी - २ 

२. मीठ - चवीनुसार 

३. साखर किंवा गूळ - अर्धी वाटी

४. तिखट - अर्धा चमचा 

५. तेल - २ चमचे 

६. मोहरी - १ चमचा 

७. जीरं - अर्धा चमचा 

८. हिंग - हळद - अर्धा चमचा 

कृती - 

१. कैरी स्वच्छ धुवून कापडाने कोरडी करुन घ्यायची.

२. त्याचे बारीक एकसारखे चौकोनी तुकडे करायचे. 

३. यावर मीठ, तिखट आणि साखर किंवा गूळ घालून चांगले एकजीव करायचे. 

४. लहान कढईमध्ये तेल घालून त्यात मोहरी आणि जीरं घालायचं.

५. हे दोन्ही चांगले तडतडले की त्यामध्ये हिंग आणि हळद घालायचे. 

६. मीठ आणि साखरेमुळे या लोणच्याला थोडा वेळाने पाणी सुटतं आणि मग ते छान लागतं. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.