Lokmat Sakhi >Food > शेफ कुणाल कपूर स्पेशल कैरीच्या चटणीची एकदम वेगळी रेसिपी, कैऱ्या संपण्यापूर्वी खायलाच हवा असा पदार्थ

शेफ कुणाल कपूर स्पेशल कैरीच्या चटणीची एकदम वेगळी रेसिपी, कैऱ्या संपण्यापूर्वी खायलाच हवा असा पदार्थ

Raw Mango Chutney Recipe By Chef Kunal Kapoor: कैरीचे दिवस आता संपत आले आहेत. त्यामुळे कुणाल कपूर स्पेशल ही चटणी लवकरच करून खाऊन पाहा..(how to make instant raw mango chutney?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2025 16:12 IST2025-05-30T15:41:10+5:302025-05-30T16:12:16+5:30

Raw Mango Chutney Recipe By Chef Kunal Kapoor: कैरीचे दिवस आता संपत आले आहेत. त्यामुळे कुणाल कपूर स्पेशल ही चटणी लवकरच करून खाऊन पाहा..(how to make instant raw mango chutney?)

raw mango chutney recipe by chef kunal Kapoor, how to make instant raw mango chutney? delicious green chutney recipe  | शेफ कुणाल कपूर स्पेशल कैरीच्या चटणीची एकदम वेगळी रेसिपी, कैऱ्या संपण्यापूर्वी खायलाच हवा असा पदार्थ

शेफ कुणाल कपूर स्पेशल कैरीच्या चटणीची एकदम वेगळी रेसिपी, कैऱ्या संपण्यापूर्वी खायलाच हवा असा पदार्थ

Highlightsकैरी भाजून घेतल्यामुळे चटणीला नक्कीच एक खमंग आणि स्मोकी फ्लेवर येत असणार....

उन्हाळ्याची खरी मजा तेव्हाच सुरू होते जेव्हा हिरव्याकंच करकरीत कैऱ्या बाजारात येतात. त्या कैरीचे आपण कित्येक वेगवेगळे पदार्थ करतो. आता कैरीची चटणी हा एक नेहमीचा पदार्थ. पण घरोघरी तो अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने तयार केला जातो. त्यामुळे चटणीच्या चवीमध्येही फरक पडतोच. आता सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी अशीच एक मस्त रेसिपी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये कैरीची चटणी करण्यापुर्वी ती भाजून घेतली आहे. आता कैरी भाजून घेतल्यामुळे चटणीला नक्कीच एक खमंग आणि स्मोकी फ्लेवर येत असणार (how to make instant raw mango chutney?). रेसिपी पाहून तर ही चटणी अतिशय चवदार होत असावी असे वाटते (raw mango chutney recipe by chef Kunal Kapoor). त्यामुळेच ही रेसिपी एकदा पटकन बघून घ्या आणि कुणाल कपूर स्टाईलने कैरीची चटणी करून पाहा.(how to make instant raw mango chutney?)

कैरीची चटणी करण्याची रेसिपी

 

साहित्य

२ मध्यम आकाराच्या कैऱ्या

३ ते ४ हिरव्या मिरच्या

अर्धी वाटी कोथिंबीर

वरवरचे उपाय करून तात्पुरता ग्लो मिळेल! त्वचेचं सौंदर्य मुळातून खुलविण्यासाठी 'हे' काम करा.. 

२ ते ३ चमचे पुदिन्याची पाने

१ इंच आल्याचा तुकडा

जीरे पूड, काळे मीठ, मीरेपूड प्रत्येकी एकेक चमचा

चवीनुसार मीठ

 

कृती

सगळ्यात आधी कैरी आणि मिरची गॅसवर ठेवून भाजून घ्या. ज्याप्रमाणे भरीत करण्याआधी आपण वांगे भाजून घेतो, त्याचप्रमाणे जाळीवर कैरी ठेवून ती भाजून घ्यावी.

भाजून झालेली कैरी थंड झाल्यानंतर तिचे सालं काढा आणि बारीक तुकडे करा.

लग्नसराईत गळ्यात घालायला हवाच ठसठशीत चंद्रहार! चारचौघींमध्ये दिसाल घरंदाज- देखण्या

आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीचे तुकडे, कोथिंबीर, पुदिना, आलं, जीरेपूड, मिरेपूड, काळं मीठ टाकून ती अगदी बारीक करून घ्या.

आता हे वाटण वाटीमध्ये काढून त्यात चवीनुसार मीठ घातलं की कैरीची चटणी झाली तयार. ही चटणी तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा फोडणी घालूनही खाऊ शकता. फ्रिजमध्ये ठेवल्यास ही चटणी १- २ दिवस चांगली टिकेल. 


 

Web Title: raw mango chutney recipe by chef kunal Kapoor, how to make instant raw mango chutney? delicious green chutney recipe 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.