उन्हाळा आला की घराघरांत हिरव्यागार कैऱ्या हमखास विकत आणल्या जातात. कैरी ही केवळ उष्णतेपासून बचाव करणारे फळ नाही, तर कैरीचे विविध चविष्ट पदार्थ केले जातात म्हणूनच कैरी (Raw mango candy) उन्हाळ्यातील खास फळ आहे. त्यामध्ये "कच्च्या कैरीची कँडी" हा एक अत्यंत लोकप्रिय आणि सगळ्यांचाच (Raw Mango Candy Recipe) आवडता प्रकार आहे. आंबटगोड, थोडीशी झणझणीत चव, आणि नैसर्गिक गोडवा अशी ही कच्च्या कैरीची कँडी फक्त चवीलाच उत्तम नाही तर (How To Make Raw Mango Candy Recipe) उन्हाळ्यात शरीराला उर्जा आणि थंडावा देण्याचेही काम करते(Sweet Dry Raw Mango Recipe).
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही पारंपरिक गोडसर कच्च्या कैरीची कँडी, मसाले आणि कच्च्या कैरीपासून तयार होते. बाजारात मिळणाऱ्या आर्टिफिशियल टेस्टच्या कँडीपेक्षा ही घरगुती कँडी अधिक चवदार, आरोग्यदायी आणि टिकाऊ असते. यासाठीच, कच्च्या कैरीची ही आंबट गोड कँडी उन्हाळ्याच्या खास आठवणींमध्ये नेहमीच आपले स्थान टिकवून ठेवते. यंदाच्या उन्हाळ्यात आंबट गोड चवीची ही कँडी तयार करण्यासाठी सोपी रेसिपी...
साहित्य :-
१. कच्च्या कैऱ्या - २ ते ३ (मध्यम आकाराच्या)
२. साखर - १ कप (किंवा चवीनुसार)
३. मीठ - १/२ टेबलस्पून
४. पिठीसाखर - १ कप
५. पाणी - २ कप
फणसाच्या आठळ्यांचे लाडू , खास मराठी पारंपरिक पदार्थ! चवीला उत्तम आणि तितकेच पौष्टिक...
भाकरी उरली, कडक झाली? मग पटकन १० मिनिटांत करा, मस्त झणझणीत - चटपटीत भाकरीचा चिवडा...
कृती :-
१. सगळ्यात आधी कैरी स्वच्छ धुवून तिची सालं काढून घ्यावीत. मग या कैरीचे उभे मध्यम आकारचे काप करुन घ्यावेत.
२. आता एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन, पाण्याला हलकीशी उकळी येऊ द्यावी.
३. या उकळत्या पाण्यांत मीठ घालावे. मीठ संपूर्णपणे या पाण्यांत विरघळवून घ्यावे.
४. आता या पाण्यांत कच्च्या कैरीचे काप घालून १० ते १५ मिनिटे हलकेच शिजवून घ्यावेत.
बेसन नको, फक्त १५ मिनिटांत करा डाळ तांदुळाचा लुसलुशीत ढोकळा - चवीला उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक...
५. कच्च्या कैरीचे शिजवून घेतलेले काप एका मोठ्या पसरट डिशमध्ये काढून हलकेच थंड करून घ्यावेत. त्यानंतर यावर साखर भुरभुरवून घालावी. मग झाकण लावून २ दिवस साखरेच्या पाकात कैरीचे तुकडे मुरू द्यावेत.
६. २ दिवसानंतर भांडं उघडल्यावर त्या साखरेचा पाक झाला असेल त्यातील कैऱ्या काढून एका डिशमध्ये वेगळ्या ठेवून ३ ते ४ दिवस संपूर्णपणे वाळवून घ्याव्यात.
७. या कैरीचे काप संपूर्णपणे वाळल्यानंतर त्यावर पिठीसाखर भुरभुरवून घालावी.
कच्च्या कैरीची मस्त आंबट - गोड कँडी खाण्यासाठी तयार आहे. कँडी पूर्ण सुकल्यावर हवाबंद डब्यात ठेवा. ती १ ते २ महिने टिकते. लहान मुलांना अतिशय आवडते आणि उन्हाळ्यात खाणे अधिक फायदेशीर आहे.