Join us

हिरव्यागार कच्च्या केळीची करा पौष्टिक टिक्की! चटपटीत, क्रिस्पी असा खास पोटभरीचा पदार्थ - पाहा रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2025 15:22 IST

Raw Banana Tikki : How To Make Raw Banana Tikki : Tiffin Snack Raw Banana Tikki Recipe For Kids : Raw Banana Cutlets : लहान मुलांच्या डब्यासाठी, संध्याकाळच्या चहासोबत किंवा उपवासाच्या दिवशी आपण ही टिक्की आवडीने खाऊ शकतो...

फळांमध्ये आपण नेहमीच पिकलेली पिवळीधम्मक केळी आणतो. परंतु या पिवळ्या केळ्यांप्रमाणेच कच्ची आणि हिरवीगार केळी ( Raw Banana Cutlets) देखील तितकीच पौष्टिक (Raw Banana Tikki) असतात. कच्च्या केळ्यांमध्ये फायबर, पोटॅशियम, आणि रेजिस्टंट स्टार्च भरपूर प्रमाणात असते, जे पचन सुधारण्यास मदत करतं आणि साखरेची पातळी नियंत्रणात (How To Make Raw Banana Tikki) ठेवण्याचे काम करते. या हिरव्यागार कच्च्या केळ्यांचे विविध प्रकारचे पौष्टिक आणि चटपटीत असे पदार्थ देखील केले जातात( Tiffin Snack Raw Banana Tikki Recipe For Kids).

कच्च्या केळ्याचे मस्त चटपटीत, कुरकुरीत वेफर्स केले जातात परंतु या कच्च्या केळ्याची पौष्टिक टिक्की देखील तितकीच चविष्ट लागते. ही कच्च्या केळ्याची टिक्की म्हणजे चव, पोषण आणि पोटभारीचा असा उत्तम पदार्थ आहे. आपल्याला चटपटीत पण आरोग्यदायी आणि पौष्टिक असे काही खायचे असेल तर आपण ही झटपट होणारी टिक्की करु शकतो. लहान मुलांच्या डब्यासाठी, संध्याकाळच्या चहासोबत किंवा उपवासाच्या दिवशी खास पदार्थ म्हणून देखील आपण ही टिक्की चवीने खाऊ शकतो. कच्च्या केळ्याची हिरवीगार टिक्की तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.  

साहित्य :- 

१. कच्ची केळी - ३ ते ४ केळी२. शेंगदाण्याचा कूट - १/२ कप ३. शिंगाडा पीठ - १ कप ४. जिरेपूड - १/२ टेबलस्पून ५. सैंधव मीठ - चवीनुसार६. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ मिरच्या (बारीक चिरलेल्या)७. लिंबाचा रस - २ टेबलस्पून ८. तेल / साजूक तूप - तळण्यासाठी९. पाणी - १/२ ग्लास 

Maharashtrian Alu Vadi Recipe: अस्सल मराठी चवीची पारंपरिक अळूवडी करायची आहे? ‘हे’ घ्या परफेक्ट प्रमाण...

डाळ पालकप्रमाणेच करा शेवगा डाळ! शेवग्याच्या पानांची चविष्ट डाळ - रेसिपी सोपी आणि पौष्टिक...

कृती :- 

१. सगळ्यात आधी कच्ची हिरवीगार केळी कुकरमध्ये थोडे पाणी घालूंन एका शिट्टीत व्यवस्थित उकडवून घ्यावीत. केळी उकडवून घेतल्यानंतर त्याची सालं काढून घ्यावी. २. आता ही उकडवून घेतलेली केळी किसणीवर किसून घ्यावी. केळी किसून घेतल्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कूट, शिंगाडा पीठ, जिरेपूड, चवीनुसार सैंधव मीठ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस असे सगळे जिन्नस घालून ते कालवून एकजीव करून घ्यावे. आता हे सगळे जिन्नस कालवून पीठ चांगले मळून घ्यावे. मळून घेतलेल्या पिठाचे गोल छोटे गोळे करून त्याची गोलाकार टिक्की तयार करुन घ्यावी.

पावसाळ्यातही परफेक्ट दही विरजण्यासाठी ५ टिप्स, घट्ट-गोडसर मस्त दही लागेल रोज...

 ३. एका पॅनमध्ये साजूक तूप किंवा तेल घालून मग टिक्की ठेवून शॅलो फ्राय करुन घ्याव्यात. ४. टिक्की दोन्ही बाजुंनी खरपूस रंग येईंपर्यंत व्यवस्थित शॅलो फ्राय कराव्यात. 

हिरव्यागार कच्च्या केळ्याची चटपटीत, क्रिस्पी टिक्की खाण्यासाठी तयार आहे. ही तयार गरमागरम टिक्की आपण हिरवी चटणी किंवा सॉस सोबत देखील खाऊ शकतो.

टॅग्स :अन्नपाककृतीफळे