Join us  

रविना टंडनने सांगितली तिच्या आईची खास रेसिपी- तुपाच्या बेरीपासून बघा कशी करायची मिठाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2024 5:30 PM

Raveena Tandon Shares Her Mom's Special Sweet Or Mithai Recipe: अभिनेत्री रविना टंडन हिने तिचा आवडीचा गोड पदार्थ कोणता आणि तो कसा करायचा, याची माहिती शेअर केली आहे... (mithai recipe made with ghee residue)

ठळक मुद्देएरवी बहुसंख्य घरांमध्ये ती बेरी साखरेसोबत खाल्ली जाते. पण रविनाच्या घरी मात्र त्या बेरीची मिठाई केली जाते.

बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन (Raveena Tandon) आता चित्रपट सृष्टीपासून बरीच दूर गेली आहे. रविना सोशल मिडियावरही फार ॲक्टिव्ह नसते. तसेच बॉलीवूडच्या लाईम लाईट पार्ट्यांमध्येही ती क्वचितच दिसते. पण तरीही रविना अजूनही तिचा विशिष्ट असा एक चाहता वर्ग टिकवून आहे. आता बऱ्याचदा रविनाच्या लेकीच्या सौंदर्याची चर्चा ऐकायला मिळते. रविनाने तिची आवडीची मिठाई कोणती आणि ती कशी तयार करायची, याविषयी काही माहिती शेअर केली आहे. ती मिठाई घरी तूप तयार होताना उरलेल्या बेरीपासून करतात (mithai recipe made with ghee residue). ही मिठाई म्हणजे तिच्या आईची स्पेशल रेसिपी आहे, असंही रविना सांगते. (Raveena Tandon shares her mom's special sweet or mithai recipe)

 

तुपाच्या बेरीपासून कशी करायची मिठाई?

तुपाच्या बेरीपासून रविना टंडनची आई खूप सोप्या पद्धतीने मिठाई तयार करते. एरवी बहुसंख्य घरांमध्ये ती बेरी साखरेसोबत खाल्ली जाते. पण रविनाच्या घरी मात्र त्या बेरीची मिठाई केली जाते. कधीतरी खूप बेरी झाली तर अशा पद्धतीने बेरीची मिठाई जरुर करून पाहा.

मुळा पाहताच नाक मुरडणारेही आवडीने फस्त करतील मुळ्याची भाजी- बघा एकदम खास रेसिपी

साहित्य

४ टेबलस्पून तूप

२ कप बेरी

शेंगदाण्यांमध्ये अळ्या होऊ नयेत म्हणून २ साेपे उपाय, महिनोंमहिने चांगले टिकतील- वासही येणार नाही

१ कप साखर

१ टीस्पून वेलची पावडर

२ चमचे बदाम, काजू, पिस्ता यांचे काप

 

कृती

१. सगळ्यात आधी तर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा.

२. कढई तापली की त्यात तूप घाला. तूप गरम झाल्यावर त्यात बेरी टाकून परतून घ्या.

व्यायाम न करता वजन कमी करायचंय? मग 'हे' ६ पदार्थ खा- वजन नेहमीच राहील आटोक्यात

३. बेरी परतून झाल्यानंतर त्यात साखर घाला. साखरेचा हळूहळू पाक होईल आणि नंतर पुन्हा घट्ट होऊन बेरी आणि साखरेचा पाक छान एकजीव होतील. याच वेळी त्यात वेलची पावडर घाला.

४. मिश्रण छान घट्ट आणि एकजीव झालं की ते एका ताटात काढून घ्या आणि थंड झाल्यावर त्याला बर्फीचा आकार द्या. त्याच्यावर तुमच्या आवडीच्या सुकामेव्याचे काप टाकले की झाली रविना टंडनच्या आईची स्पेशालिटी असणारी बर्फी तयार. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.रवीना टंडन