आता वाढदिवसाला केक कापणं फारच साधारण होऊन गेलं आहे. लहान मुलांचा वाढदिवस असो किंवा कोणा मोठ्याचा असो आपण केक कापतोच. (Rava Cake Perfect Recipe Soft And Spongy )आता विकतचे केक आणले जातात. वेगवेगळ्या फ्लेवरचे, आकाराचे, थिमचे. पण एकेकाळी वाढदिवस म्हटलं की, आई घरीच छान केक तयार करायची. आपणही तो आवडीने खायचो. साधा सोपा रवा केक कुकरमध्ये तयार करण्यात आईलाही फार आनंद वाटायचा. त्या केकवर काही तरी डेकोरेशन हवं म्हणून मग जेम्सच्या गोळ्या लावायची.(Rava Cake Perfect Recipe Soft And Spongy ) सुकामेवा त्यावर डिझाइन म्हणून लावायची. आता आठवण काढलीच आहे तर, चला मस्त रवा केक तयार करा. घरी केलेला रवा केक मऊ होत नाही? या पद्धतीने तयार करून बघा. नक्कीच मऊ होईल.
साहित्य
रवा, दूध, पीठी साखर, दही, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, तूप
प्रमाण घेताना १ वाटी रव्यासाठी १ वाटी साखर घ्या. तुम्हाला गोड कितपत आवडते त्यानुसार बदल करा. चार चमचे तूप वापरा. दूध जवळपास अर्धी वाटी लागते. (Rava Cake Perfect Recipe Soft And Spongy )जर तेवढ्यामध्ये मिश्रण पातळ झाले नाही तर, थोडं अजून दूध वापरा. एक चमचा बेकिंग सोडा व एक चमचा बेकिंग पावडर, अर्धी वाटी दही वापरा. दही घरचे असेल तर उत्तम.
कृती
१. रवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. अगदी काही सेकंद फिरवा. जाडसरच ठेवा. भुगा करू नका.
२. एका भांड्यामध्ये पातळ केलेले तूप घ्या. त्यामध्ये वाटीभर पीठी साखर घाला. अर्धी वाटी दही घाला. ते व्यवस्थित मिक्स करा. त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
३. त्यात बारीक केलेला रवा घाला. गरजेनुसार दूध घाला. सगळं मिश्रण अति पातळ करू नका. ते जरा घट्टच राहू द्यायचे. पाणी अजिबात वापरू नका.
४. थोडावेळ ते मिश्रण झाकून बाजूला ठेवा. एक पंधरा मिनिटांनी पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. त्यामध्ये चमचाभर बेकिंग सोडा व पावडर घाला. पुन्हा मिक्स करून घ्या.
५. एका खोलगट भांड्याला तूप लाऊन घ्या. त्यामध्ये तयार मिश्रण ओता. नीट सेट करून घ्या. आणि कुकरमध्ये ठेऊन तासभर मंद आचेकर शिजवून घ्या. थोड्या-थोड्या वेळाने सुरीने केक तयार झाला आहे का? ते तपासत राहा. बटर पेपर वापरलात तर उत्तमच. नसेल तरी हा केक चिकटत नाही.