संकष्टी चतुर्थीचा उपवास अनेक जण करतात. काही काही घरांमध्ये तर घरातल्या सगळ्याच जणांना संकष्टीचा उपवास असतो. त्यानिमित्ताने सगळ्यांसाठीच काहीतरी पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ करायचा असेल तर रताळ्याचा किस हा एक चांगला पर्याय आहे. आपल्याला माहितीच आहे की रताळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे तो पोटासाठी अतिशय दमदार असतो. रताळ्याचा किस खाल्ल्यानंतर पुढे बराच वेळ भूक लागत नाही. शिवाय पचायलाही तो चांगला असतो. त्यामुळे उपवासाच्या दिवशी इतर तेलकट, तुपकट आणि पचायला जड असणारे पदार्थ खाण्यापेक्षा अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारा रताळ्याचा किस खाऊन पाहा.. नाश्त्यासाठी तर हा पदार्थ अगदी परफेक्ट आहे.
रताळ्याचा किस करण्याची रेसिपी
साहित्य
४ ते ५ मध्यम आकाराचे रताळे
३ ते ४ हिरव्या मिरच्या
२ ते ३ टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट
छोट्या- छोट्या गोष्टींचाही खूप विचार करता- झोपही येत नाही? 'ही' योगमुद्रा करा- मन शांत होईल
चवीनुसार तिखट आणि मीठ
१ टीस्पून साखर
२ टेबलस्पून तूप
कृती
सगळ्यात आधी रताळे स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांची सालं काढून ते किसून घ्या.
गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तूप घाला. तूप चांगलं तापल्यानंतर त्यात मिरच्या घालून परतून घ्या. मिरच्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये रताळ्याचा किस घाला आणि तो व्यवस्थित हलवून घ्या.
लग्नानंतर काही वर्षांनी कपल्स एकसारखे का दिसू लागतात? हे प्रेम असतं की.....
आता कढईवर झाकण ठेवा आणि ५ ते ७ मिनिटे वाफ येऊ द्या. यानंतर पुन्हा एकदा सगळा किस हलवून घ्या. त्यामध्ये चवीनुसार तिखट आणि मीठ घाला आणि पुन्हा एकदा सगळं हलवून काही मिनिटांसाठी तो झाकून ठेवा.
यानंतर किसलेल्या रताळ्यांना चांगली वाफ आली असेल तर त्यामध्ये दाण्याचा कूट आणि साखर घाला. सगळं व्यवस्थित हलवून एकत्र करा आणि पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. गरमागरम रताळ्याचा किस झाला तयार.