Lokmat Sakhi >Food > रमजान ईद: शीरखुर्म्याची खास रेसिपी, चवीला लाजवाब आणि तब्येतीसाठी उत्तम...

रमजान ईद: शीरखुर्म्याची खास रेसिपी, चवीला लाजवाब आणि तब्येतीसाठी उत्तम...

Ramzan Eid Special Sheer Khurma Recipe: गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरीचा बेत झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी शीरखुर्मा करून स्वत:लाच छान मेजवानी द्या..(how to make sheer khurma?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2025 09:20 IST2025-03-30T09:14:35+5:302025-03-30T09:20:01+5:30

Ramzan Eid Special Sheer Khurma Recipe: गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरीचा बेत झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी शीरखुर्मा करून स्वत:लाच छान मेजवानी द्या..(how to make sheer khurma?)

Ramzan eid special sheer khurma recipe, how to make sheer khurma, easy recipe of sheer khurma | रमजान ईद: शीरखुर्म्याची खास रेसिपी, चवीला लाजवाब आणि तब्येतीसाठी उत्तम...

रमजान ईद: शीरखुर्म्याची खास रेसिपी, चवीला लाजवाब आणि तब्येतीसाठी उत्तम...

Highlightsशीरखुर्मा चवीला तर उत्तम असतोच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे त्याचा आस्वाद नक्की घ्या. 

यंदा गुढीपाडवा आणि रमजान ईद हे दोन्ही मोठे सण अगदी लागोपाठ आले आहेत. त्यामुळे सगळीकडेच आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. कोणताही सण म्हटला की त्याचा एक पारंपरिक पदार्थ ठरलेला असतो. जसं की गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड- पुरीला महत्त्व आहे तर शीरखुर्म्याशिवाय रमजान ईद नाहीच.. त्यामुळे खवय्यांना दोन दिवस दोन उत्तम पदार्थांची मेजवानी मिळणार आहे (Ramzan Eid Special Sheer Khurma Recipe). यंदा जर शीरखुर्मा तुम्हाला घरीच करून पाहायचा असेल तर ही बघा त्याची अस्सल पारंपरिक पद्धत..(how to make sheer khurma?)

 

शिरखुर्म्याची रेसिपी

साहित्य

एक लीटर दूध

पाव किलो शेवया

कामाचा ताण वाढल्याने डोकं जड पडलं? 'हा' चहा प्या, ताण कमी होऊन रिलॅक्स वाटेल 

अर्धी वाटी तूप

दोन वाट्या साखर

खजूर, बदाम, काजू, पिस्ता, चारोळ्या, खोबरं असा सगळा सुकामेवा मिळून एक वाटी

कृती

सगळ्यात आधी तर दूध एकीकडे आटवायला ठेवून द्या.

 

त्यानंतर बदाम, काजू, पिस्ता, चारोळ्या आणि खोबरं हे पदार्थ गरम पाणी करून त्यामध्ये एखादा तास भिजत ठेवा. आणि त्यानंतर खोबरं, चारोळी वगळून इतर सुकामेव्याचे उभे काप करा. बदामाची सालं काढून घ्यावीत. तसेच खोबऱ्याचाही काळा भाग काढून घ्यावा आणि नंतर ते किसून घ्यावे.

१ पैसाही खर्च न करता करा 'हा' सोपा उपाय- वय वाढलं तरी चेहरा दिसेल तरुण, चमकदार 

आता एका कढईमध्ये तूप गरम करायला ठेवा. तूप तापल्यानंतर त्यामध्ये उभे चिरलेले खजूर, चारोेळ्या, खोबऱ्याचा किस, आणि इतर सुकामेव्याचे काप घालून परतून घ्या. सुकामेवा लालसर परतून घेतल्यानंतर तो कढईतून बाहेर काढा आणि त्याच कढईमध्ये पुन्हा थोडेसे तूप घालून शेवया परतून घ्या. 

 

दूध बऱ्यापैकी उकळून त्याचा रंग हलकाचा बदलला असेल तर त्या दुधामध्ये साखर आणि परतून घेतलेला सुकामेवा घाला. आणि सगळ्यात शेवटी गॅस बंद करण्यापुर्वी अगदी थोड्या शेवया घाला.

फक्त कॅल्शियममुळेच नाही तर 'या' गोष्टींमुळेही हाडं झिजतात- कमी वयातच कमकुवत होतात

शीरखुर्मा सर्व्ह करताना वाटीमध्ये आधी परतून घेतलेल्या शेवया घालाव्या आणि नंतर त्यावर दूध घालावे. असा हा शीरखुर्मा चवीला तर उत्तम असतोच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे त्याचा आस्वाद नक्की घ्या. 

 

Web Title: Ramzan eid special sheer khurma recipe, how to make sheer khurma, easy recipe of sheer khurma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.