रामनवमीचा उत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा होतो (Ram Navami 2026). यावेळी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. मंदिरांमध्ये तर रामनवमीचा समारंभ थाटात असतोच. पण घरोघरीही श्रीरामाची पूजा केली जाते. रामाला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. या नैवेद्याच्या पदार्थांपैकी एक प्रमुख पदार्थ बहुतांश ठिकाणी केला जातो आणि तो म्हणजे पंजिरी. नैवेद्याला इतर गोड पदार्थ असले तरी यादिवशी पंजिरी यापारंपरिक पदार्थाला मोठेच महत्त्व आहे. कारण ती खूप आरोग्यदायीही मानली जाते. आता ही पंजिरी कशी करायची ते पाहुया... पंजिरी करण्याचे दोन वेगवेगळे प्रकार असून यापैकी तुम्हाला जी रेसिपी आवडेल ती पाहून पंजिरी नक्की ट्राय करून बघा..(Ram Navami panjiri naivedya recipe)
१. धणे पंजिरी रेसिपी
धणे पंजिरी करण्यासाठी कढई गॅसवर गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये पाव कप खोबऱ्याचा किस घालून मंद आचेवर भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर खोबऱ्याचा किस कढईतून काढून घ्या. आता त्याच कढईमध्ये थोडं तूप घाला आणि अर्धा कप मखाने परतून घ्या.
शरीरात वात वाढण्याची ७ लक्षणं वेळीच ओळखा, दुर्लक्ष करणं पडेल महागात, त्रास वाढण्याआधीच करा 'हे' उपाय
मखाने परतून झाल्यानंतर काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, मनुका असे सुकामेव्यांचे मिळून अर्धा कप तुकडेही मंद आचेवर परतून घ्या. सगळ्यात शेवटी पाव कप धणे पावडर कढईमध्ये टाकून ती थोडी गरम करून घ्या. भाजून घेतलेले सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर त्यामध्ये साखर आणि वेलची पूड घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घेतले की झाली पंजिरी तयार. काही ठिकाणी हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये घालून त्यांची जाडसर पावडरही केली जाते.
२. गव्हाच्या पिठाची पंजिरी रेसिपी
गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये पाव कप तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर १ कप गव्हाचे पीठ घालून ते मंद आचेवर परतून घ्या. दुसरीकडे वेगवेगळ्या सुकामेव्याचे पाव कप बारीक तुकडे, पाव कप किसलेलं खोबरं, पाव कप मखाना हे देखील तुपामध्ये परतून घ्या.
सोहा अली खानने शेअर केली सूप रेसिपी- हाडं बळकट होण्यासाठी प्रत्येकीने प्यायलाच हवं खास सूप
गव्हाचे पीठ परतून झाल्यानंतर त्यामध्ये सुकामेवा, खोबरं, मखाना असे इतर पदार्थ घाला. सगळं एकत्रित परतून झाल्यानंतर गॅस बंद करा. सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप गुळाची पावडर किंवा किसलेला गूळ, १ टीस्पून वेलची पावडर, थोडी तुळशीची पानं घाला. गव्हाची पंजिरी झाली तयार.
Web Summary : Celebrate Ram Navami 2026 with traditional Panjiri. Two recipes are shared: one with coriander seeds and another with wheat flour. Both involve roasting ingredients like dry fruits and coconut, then mixing with sugar or jaggery and cardamom. A simple, healthy offering for the festival.
Web Summary : रामनवमी 2026 को पारंपरिक पंजीरी के साथ मनाएं। धनिया के बीज और गेहूं के आटे से बनी दो रेसिपी साझा की गई हैं। दोनों में सूखे मेवे और नारियल जैसे सामग्री को भूनना, फिर चीनी या गुड़ और इलायची मिलाना शामिल है। त्योहार के लिए एक सरल, स्वस्थ भोग।