Join us

दिल्लीचा फेमस राम लड्डू करण्याची ही घ्या चटकदार रेसिपी, अब दिल्ली दूर नहीं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2024 13:44 IST

Ram Ladoo Recipe I Delhi Street food : नावात लाडू असेल तरी हा पदार्थ गोड नाही, तर चाटचा अफलातून प्रकार आहे.

सायंकाळ झाली की मुंबईची लोकं आवडीने चटकदार चाटचा (Street Food) आस्वाद घेतात. मुंबईच्या स्ट्रीट फूडची बातच न्यारी आहे. पाणीपुरी, शेवपुरी, रगडापुरी आणि भेळपुरी हे चाटचे प्रकार सर्वांनाच ठाऊक आहेत. पण कधी दिल्लीमधील चाटचे प्रकार खाऊन पाहिलं आहे का? दिल्लीमध्ये आलू टिक्कीपासून ते रगडा पॅटिसपर्यंत बरेचसे चाटचे प्रकार फेमस आहेत. पण आपण कधी राम लड्डू हा चाटचा प्रकार खाऊन पाहिलं आहे का?

दिल्लीवाले राम लड्डू हा पदार्थ आवडीने खातात. शिवाय घरी केल्यास ही रेसिपी झटपट तयार होते. राम लड्डू (Ram Laddoo) हा प्रकार लाडवाचा नसून, भजीचा आहे (Cooking Tips). जी चवीला उत्कृष्ट आणि चविष्ट लागते. चला तर मग दिल्लीतील फेमस राम लड्डू हा चाटचा प्रकार कसा तयार करायचा पाहूयात(Ram Ladoo Recipe I Delhi Street food ).

दिल्लीवाले फेमस राम लड्डू करण्यासाठी लागणारं साहित्य

उडीद डाळ

मूग डाळ

चणा डाळ

किसलेला मुळा

मीठ

हिरवी मिरची

कोण म्हणतं मटार वर्षभर टिकत नाहीत? १ सोपी युक्ती, मटार फ्रिजमध्ये राहतील हिरवेगार-ताजे

आलं

मीठ

तेल

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये  २ कप मूग डाळ, अर्धा कप उडीद डाळ आणि अर्धा कप चणा डाळ घ्या. त्यात पाणी घालून डाळी स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात ३ कप पाणी घालून ५ ते ६ तासांसाठी भिजत ठेवा. मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मूग, उडीद आणि चणा डाळ घालून वाटून घ्या. नंतर त्यात २ हिरव्या मिरच्या, मुळ्याचा किस, एक इंच आलं आणि चवीनुसार मीठ घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करत असताना त्यात आपण २ चमचे पाणी घालू शकता.

डाळ शिजली नाही तरी चालेल, करा १ चमचा बेसनाचे सांबार, चमचमीत झटपट रेसिपी खास थंडीसाठी

पेस्ट तयार झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर बिटरने पेस्ट फेटून घ्या. जोपर्यंत फ्लफी बॅटर तयार होत नाही तोपर्यंत फेटून घ्या. दुसरीकडे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात तळणीसाठी तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात तयार बॅटरचे छोटे छोटे गोळे सोडून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. तयार भजी एका प्लेटमध्ये काढून घ्या.

नंतर एका प्लेटमध्ये किसलेला मुळा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. डिश सर्व्ह करताना राम लड्डूवर हिरवी चटणी आणि तयार मुळ्याचं सॅलॅड पसरवून घ्या. अशा प्रकारे दिल्लीतील स्पेशल चाट राम लड्डू खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :दिल्लीअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स