lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > रक्षाबंधन विशेष : ना मैदा - ना खवा, अर्धा कप गव्हाच्या पीठाचे करा मस्त गुलाबजाम, रक्षाबंधन होईल स्पेशल

रक्षाबंधन विशेष : ना मैदा - ना खवा, अर्धा कप गव्हाच्या पीठाचे करा मस्त गुलाबजाम, रक्षाबंधन होईल स्पेशल

Raksha Bandhan Special : How to make soft wheat-flour Gulab Jamun? मैदा आहे म्हणून गुलाब जाम खाणं टाळताय? अर्धा कप गव्हाच्या पीठाचे करून पाहा मस्त गुलाब जाम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2023 11:52 AM2023-08-22T11:52:06+5:302023-08-22T14:38:31+5:30

Raksha Bandhan Special : How to make soft wheat-flour Gulab Jamun? मैदा आहे म्हणून गुलाब जाम खाणं टाळताय? अर्धा कप गव्हाच्या पीठाचे करून पाहा मस्त गुलाब जाम..

Raksha Bandhan Special : How to make soft wheat-flour Gulab Jamun? | रक्षाबंधन विशेष : ना मैदा - ना खवा, अर्धा कप गव्हाच्या पीठाचे करा मस्त गुलाबजाम, रक्षाबंधन होईल स्पेशल

रक्षाबंधन विशेष : ना मैदा - ना खवा, अर्धा कप गव्हाच्या पीठाचे करा मस्त गुलाबजाम, रक्षाबंधन होईल स्पेशल

श्रावण सुरु झाल्यानंतर सणांची रेलचेल सुरु होते. एका पाठोपाठ सणवार येतात. आता काही दिवसात भाऊ - बहिणींचा आवडता सण म्हणजेच रक्षा बंधन येईल. या दिवशी बहिण - भावाला राखी बांधते. या सणानिमित्त काही बहिणी आपल्या भावासाठी खास गोड पदार्थ करतात. जलेबी, पेढे, बर्फी हे पदार्थ हमखास केले जातात.

काही लोकांना गोड पदार्थ आवडत नाही, पण गुलाब जाम आवडीने खातात. बाजारातून गुलाब जाम आणण्यापेक्षा आपण घरी गुलाब जाम तयार करू शकता. काही लोकं खव्याचे, तर काही मैदाचे गुलाब जाम तयार करतात. जर आपल्याला हेल्दी गुलाब जाम खायचं असेल तर, मैद्याच्या पीठाऐवजी गव्हाच्या पिठाचा गुलाब जाम तयार करा. गव्हाच्या पिठाचा गुलाब जाम कसा तयार करायचा पाहूयात(Raksha Bandhan Special : How to make soft wheat-flour Gulab Jamun?).

गव्हाच्या पिठाचे गुलाब जाम करण्यासाठी लागणारं साहित्य

गव्हाचं पीठ

तूप

नाश्त्याला करा गुजराथी हांडवो, १ कपभर रव्याचा इन्स्टंट हांडवो! नेहमीच्या पोहे-उपम्यापेक्षा वेगळी चव

साखर

पाणी

केसर

वेलची पूड

बेकिंग सोडा

मिल्क पावडर

दूध

कृती

सर्वप्रथम, एका कढईत एक मोठा चमचा तूप घाला. तूप विरघळल्यानंतर त्यात अर्धा कप गव्हाचं पीठ घालून मंद आचेवर भाजून घ्या. व भाजून घेतलेलं पीठ एका बाऊलमध्ये काढून ठेवा. दुसरीकडे पाक तयार करा. पॅनमध्ये दीड कप साखर घ्या. त्यात २ कप पाणी घालून चमच्याने ढवळत राहा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात केसर, अर्धा चमचा वेलची पावडर घालून मिक्स करा. पाकाला घट्टपणा आल्यानंतर गॅस बंद करा. व पाक थंड होण्यासाठी एका बाऊलमध्ये काढून ठेवा.

न आंबवता - ५ डाळींचा करा प्रोटीन डोसा! वजन कमी करण्यासाठी बेस्ट नाश्ता, ग्लुटेन फ्री स्पेशल डोसा

भाजलेलं गव्हाचं पीठ थंड झाल्यानंतर एका परातीवर चाळण ठेवा. त्यात भाजलेलं गव्हाचं पीठ, पाव चमचा बेकिंग सोडा, अर्धा कप मिल्क पावडर घालून चाळून घ्या. चाळलेल्या पिठात ७ ते ८ चमचे दूध घाला. व पीठ हाताने मळून घ्या. आपण त्यात गरजेनुसार दूध घालू शकता. पीठ मळून झाल्यानंतर हाताला तेल लावा. व छोटे - छोटे गुलाब जाम वळवून घ्या. गुलाब जाम तळण्यासाठी एका कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात तयार पीठाचे गोळे घालून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. तळलेले गुलाब जाम पाकात सोडा. ५ मिनिटानंतर गुलाब जामचा आस्वाद घ्या.

Web Title: Raksha Bandhan Special : How to make soft wheat-flour Gulab Jamun?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.