Marwari Kulfi Recipe: राजस्थानमधील अनेक वेगवेगळे पदार्थ खूप फेमस आहेत. पण मारवाडी कुल्फीची टेस्ट काही औरच असते. या कुल्फीची टेस्ट मनाला मोहिनी घालणारी असते. एकदा का ही कुल्फी तुम्ही खाल तर याची टेस्ट लगेच विसरता येत नाही. ही खास आणि टेस्टी कुल्फी तुम्ही घरीच तयार करू शकता आणि टेस्टचा आनंद घेऊ शकता.
मारवाडी कुल्फीला राजस्थानी कुल्फी सुद्धा म्हटलं जातं. ही कुल्फी राजस्थानची शान मानली जाते. कारण जे कुणी एकदा ही कुल्फी खातात, ते आयुष्यभर याची टेस्ट विसरत नाही. आनंदाची बाब म्हणजे ही कुल्फी खाण्यासाठी तुम्हाला राजस्थानला जाण्याची गरज नाही कारण तुम्ही ही घरीच तयार करू शकता.
काय लागेल साहित्य?
मारवाडी कुल्फी बनवण्यासाठी 1 लीटर दूध, 1/4 कप साखर, 1 चमचा वेलची पावडर, 7 ते 8 केसरची पानं. यात तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्सही टाकू शकता. सोबतच लवकर तयार करण्यासाठी यात मिल्क पावडरही टाकू शकता.
कशी बनवाल?
सगळ्यात आधी दूध कढाईमध्ये टाकून घट्ट होईलपर्यंत उकडा. जर दूध लवकर घट्ट करायचं असेल तर यात दूध पावडर टाका. जेव्हा दूध रबडीसारखं होईल तेव्हा यात साखर आणि केसर टाका. सोबतच ड्रायफ्रूट्सही टाका.
आता जेव्हा कुल्फीचं मिश्रण थंड होऊ द्या. तेव्हा ते कुल्फीच्या साच्यात किंवा वाटीमध्ये टाका. नंतर ते फ्रीजरमध्ये चांगल्या फॉइल किंवा पॉलीपॅगनं झाका व रात्रभर गोठू द्या.
सकाळी फ्रिजमधून कुल्फी काढा. त्यावर थोडे ड्रायफ्रूट्स टाका आणि थंड थंड टेस्टी मारवाडी कुल्फीचा आनंद घ्या. एकदा जर तुम्ही ही कुल्फी खाल्ली तर नेहमीच घरी करून खाल.