भाजीमध्येही अनेक प्रकरा असतात. परतलेली भाजी, सुकी भाजी, रस्सा भाजी अशा विविध पद्धती असतात. कांदा बटाटा परतून सुकी भाजी आपण अनेकदा करतो. (quickly make onion potato gravy, very tasty and spicy)मसाला डोसा करताना त्याची भाजी अशीच केली जाते. मात्र कांदा बटाटा रस्सा हा वर्षानुवर्ष घरी केला जाणारा फार चविष्ट प्रकार आहे. करायला अगदी सोपी अशी ही भाजी चपाती, भाकरीसोबत छान लागतेच. मात्र भातावर खुप मस्त लागते.
साहित्य
कांदा, बटाटा, लसूण, आलं, कोथिंबीर, तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद, पाणी, नारळ, गूळ, लाल तिखट, गरम मसाला, मीठ
कृती
१. बटाटा व्यवस्थित धुवायचा. मग छान उकडून घ्यायचा. बटाट्याची सालं काढून घ्यायची. मग बटाट्याचे तुकडे करायचे आणि तुकड्यांना मीठ, लाल तिखट लावायचे. तसेच थोडावेळ झाकून ठेवायचे.
२. कांदा छान बारीक चिरुन घ्यायचा. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. कोथिंबीर एकदम बारीक चिरायची. आलं किसून घ्यायचं.(quickly make onion potato gravy, very tasty and spicy) किसलेल्या आल्याची चव पदार्थात जास्त छान उतरते. चांगला ताजा नारळ छान खवून घ्या. सुके खोबरे सुद्धा चालते मात्र नारळाची रसरशीत चव जास्त छान लागते. गूळ किसून घ्यायचा अगदी थोडाच गूळ घ्या. नाही घेतला तरी चालेल.
३. एका कढईत फोडणी करायची. त्यासाठी तेल घ्यायचे त्यात मोहरी घालायची. मोहरी छान तडतडल्यावर त्यात जिरे घालायचे तसेच थोडे हिंग घालायचे. सगळं छान परतल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान खमंग परतायचा. मग त्यात कोथिंबीर घालायची. गरम मसाला घालायचा. किसलेले आले घालायचे. थोडी हळद घालायची. छान बारीक चिरलेला लसूण त्यात घालायचा. सगळं परतून घ्यायचे. मग त्यात उकडलेल्या बटाटच्याचे तुकडे घालायचे आणि सगळं परतायचं.
४. परतून झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालायचे आणि मग भाजीत पाणी घालून एक उकळी काढून घ्यायची. त्यात थोडा गूळ घालायचा. नारळ घालायचा आणि मग पुन्हा झाकून ठेवायचे. एक वाफ काढल्यावर मस्त चमचमीत रस्सा तयार होईल.