उन्हाळा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो फळांचा राजा 'आंबा'. आंब्यापासून बनवलेले आमरस, लोणची आणि मुरांबा आपण आवडीने खातोच, पण लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचा जीव ज्या पदार्थात अडकलेला असतो, तो म्हणजे 'आम पापड' किंवा 'आंबा पोळी'.(Easy summer mango recipes marathi) बालपणीच्या आठवणी जागवणारा हा चटपटीत आणि रसाळ आम पापड घरी करणं अनेकांना कठीण काम वाटतं. पारंपरिक पद्धतीने आंब्याचा गर आटवणं, तासन्तास गॅससमोर उभं राहणं आणि सुकवण्याच्या लांबलचक प्रक्रियेमुळे अनेकजण घरी आम पापड बनवणं टाळतात.(How to make Aamba Poli at home)पण आता कुकरच्या एका शिट्टीत आपण बाजारात मिळतो तसा पारदर्शक, मऊ आणि चविष्ट आम पापड तयार करु शकतो. उन्हाळ्यात जेव्हा मुले सुट्टीत घरी असतात, तेव्हा त्यांच्यासाठी पौष्टिक आणि पौष्टिक खाऊ एक उत्तम पर्याय ठरतो. कुकरच्या मदतीने अगदी कमी मेहनतीत आणि मोजक्या साहित्यात हा आम पापड कसा करायचा. (Mango pulp cooking in pressure cooker)
साडी १ - ड्रेस ७, जुन्या खणाच्या साडीतून शिवा ७ डिझायनर इंडो-वेस्टन ड्रेस, कमी बजेट- लूक स्टायलिश
साहित्य
कच्ची कैरी - २ आंबा - १पाणी - १ कप जिरे - १ चमचादालचिनी - १ तुकडा हिरवी वेलची - १ काळी मिरी - ५ ते ६साखर - १ कपकाळे मीठ - अर्धा चमचातेल - ग्रीससाठी
कृती
1. सगळ्यात आधी कैरी आणि आंबा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. दोघांच्या वरचे साल काढून घ्या. आता कैरी आणि आंब्याचे तुकडे करा.
2. यानंतर कुकरमध्ये पाणी घालून त्यात कापलेल्या कैरीचे तुकडे, जिरे, दालचिनी, हिरवी वेलची आणि काळी मिरी घालून १ शिट्टी काढून घ्या.
3. कुकर थंड झाल्यानंतर एका बाऊलमध्ये चाळणी ठेवून तयार कैरीचा गर गाळून घ्या. आता गॅसवर कढई ठेवून त्यात गर आणि साखर घालून चांगले शिजवून घ्या.
4. एका ताटाला किंवा ट्रेला थोडे तूप लावून घ्या. तयार मिश्रण पातळ थरात ताटावर पसरवा हे ताट कडक उन्हात १-२ दिवस किंवा पंख्याखाली २ दिवस ठेवा. जेव्हा मिश्रण हाताला चिकटणार नाही, तेव्हा समजा आम पापड तयार आहे.
5. हा आम पापड पूर्ण वाळल्यानंतर त्याच्या वड्या पाडून किंवा रोल करून हवाबंद डब्यात साठवून ठेवा. हा पापड महिनाभर टिकतो.
Web Summary : Make instant Aam Papad using a pressure cooker! This easy recipe combines raw mangoes and ripe mangoes with spices, offering a sweet and tangy treat perfect for kids during summer holidays. Just one cooker whistle needed!
Web Summary : प्रेशर कुकर का उपयोग करके झटपट आम पापड़ बनाएं! यह आसान रेसिपी कच्चे आम और पके आम को मसालों के साथ मिलाती है, जो गर्मियों की छुट्टियों के दौरान बच्चों के लिए एकदम सही मीठा और खट्टा व्यंजन है। बस एक कुकर की सीटी चाहिए!