बऱ्याचदा असं होतं की मुलांना शाळेच्या डब्यात भाजी- पोळी नेण्याचा कंटाळा आलेला असतो. त्यांना काहीतरी वेगळं आणि चटपटीत हवं असतं. अशावेळी सकाळच्या गडबडीत मुलांना झटपट होणारा आणि कमीतकमी मेहनत लागणारा कोणता पदार्थ द्यावा हा प्रश्न प्रत्येक आईला पडतोच.. त्यासाठीच ही कांदा- कोथिंबीर पराठ्याची रेसिपी पाहून घ्या. ही रेसिपी अतिशय सोपी आहे (onion coriander paratha for kids tiffin and breakfast). शिवाय हा पराठा तयार करण्यासाठी तुम्हाला खूपच कमी साहित्य लागतं. शिवाय अगदी १० ते १२ मिनिटांत पराठा होऊ शकतो.(how to make onion coriander paratha?)
कांदा- कोथिंबीर पराठा रेसिपी
१ वाटी कणिक
१ मध्यम आकाराचा कांदा
३ ते ४ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टीस्पून हळद
दिवाळीत पणत्यांमध्ये महागडं तेल घालायला नको वाटतं? फक्त १० रुपयांचा उपाय- लावा भरपूर पणत्या
जिरेपूड, धनेपूड, चाट मसाला, पावभाजी मसाला प्रत्येकी एकेक टीस्पून
चवीनुसार मीठ आणि लाल तिखट
अर्ध्या लिंबाचा रस
कृती
कांदा- कोथिंबीर पराठा करण्यासाठी सगळ्यात आधी पोळ्या करण्यासाठी जशी कणिक मळून घेतो, तशीच कणिक मळून घ्या. यानंतर मळून घेतलेली कणिक काही मिनिटांसाठी झाकून ठेवा.
दिवाळीपर्यंत चेहऱ्याला रोज 'या' पद्धतीने ग्लिसरीन लावा, फेशियल न करताही चेहरा मस्त चमकेल
कणिक भिजेपर्यंत कांदा अगदी बारीक पण उभा- उभा चिरून घ्या. चिरलेला कांदा एका मोठ्या भांड्यात टाका. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, मसाला, जिरेपूड, धनेपूड, चाट मसाला असं सगळं घाला. यानंतर सगळ्यात शेवटी त्यात मीठ आणि लिंबाचा रस घालावा. कारण तो जर आधी घातला तर कांद्याला पाणी सुटतं.
आता कणकेचा एक छोटा गोळा घ्या. तो थोडा लाटून त्यात तयार केलेलं कांदा आणि कोथिंबीरीचं सारण घाला. आणि बटाट्याचा स्टफ पराठा लाटतो, तसा हा पराठा लाटून घ्या. यानंतर तव्यावर टाकून खमंग भाजून घ्या.
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी परफेक्ट नाश्ता कोणता? घ्या यादी- शुगर, वजन दोन्हीही राहील कंट्रोलमध्ये
या पराठ्याला बटर किंवा तूप लावून खाल्ल्यास त्याची चव आणखी छान लागते. तुम्ही जर बरेच पराठे करणार असाल तर कांदा, इतर मसाले आणि कोथिंबीर आधीच एकत्र करून ठेवा. पण मीठ आणि लिंबाचा रस मात्र ३ ते ४ पराठ्यांना पुरेल एवढ्या अंदाजानेच टाका. कारण नंतर कांद्याला खूप पाणी सुटतं.