Join us  

नाश्त्याला करा चना चाट! दीपिका सिंगने सांगितली प्रोटिन्स- फायबर भरपूर असलेली चविष्ट सुपर हेल्दी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2024 3:42 PM

Proteins And Fibre Rich Chana Chat Recipe: चना चाट ही प्रोटिन्स आणि फायबरने एकदम खच्चून भरलेली रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा. लहान मुलांसकट घरातल्या सगळ्यांना नक्की आवडेल... (chana chat recipe for weight loss)

ठळक मुद्दे ही रेसिपी अगदी सोपी आहे. शिवाय झटपट होणारी. त्यामुळे सकाळच्या गडबडीत नाश्त्यासाठी काही झटपट करायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळी लागलेली छोटीशी भूक भागविण्यासाठी काहीतरी टेस्टी पण हेल्दी खायला हवंच असतं. नेमकं अशावेळी स्वत:साठी किंवा घरातल्या मंडळींसाठी काय करावं ते कळत नाही. म्हणूनच चना चाट करण्याची रेसिपी एकदा पाहून घ्या. हा एक छान चवदार पदार्थ आहे. त्यात आपण फुटाणे टाकणार आहोत. त्यामुळे या रेसिपीतून आपल्याला भरपूर प्रोटीन्स मिळतील (perfect recipe for breakfast). शिवाय त्यात आपण वेगवेगळ्या भाज्याही टाकणार आहोत (Proteins and fibre rich chana chat recipe). या भाज्यांमधून व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबरही मिळतील. वेटलॉस करणाऱ्यांसाठीसुद्धा ही एक परफेक्ट रेसिपी आहे. (Chana chat recipe for weight loss)

चना चाट रेसिपी

 

साहित्य

१ वाटी फुटाणे

कांदा, टोमॅटो, काकडी, पत्ताकोबी, सिमला मिरची या सगळ्या भाज्या मिळून १ वाटी

अर्ध लिंबू

सिंकमधून खूपच कुबट वास येतो, ३ उपाय करा- सिंक स्वच्छ होऊन दुर्गंधी निघून जाईल

२ टेबलस्पून डाळिंबाचे दाणे

चवीनुसार मीठ

१ टीस्पून चाट मसाला

१ टीस्पून काळे मीठ

२ टीस्पून मोहरीचं तेल 

 

कृती 

सगळ्यात आधी एका भांड्यात फुटाणे घ्या.

कांदा, टोमॅटो, पत्ताकोबी, सिमला मिरची, कोथिंबीर या भाज्या बारीक चिरून घ्या. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात गाजर, बीटदेखील टाकू शकता. तिखटासाठी हिरव्या मिरचीचे बारीक कापही घालू शकता.

वजन वाढण्याचं टेन्शन? 'या' पद्धतीने खा धणे, बघा चमच्याभर धण्यांची कमाल, वजन वाढणारच नाही

आता फुटाणे आणि बारीक चिरलेल्या भाज्या एकत्र करा. त्यात मीठ, काळे मीठ, डाळिंबाचे दाणे, तेल, चाट मसाला घालून लिंबू पिळा. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. 

चटपटीत चना चाट झालं तयार.. ही रेसिपी अगदी सोपी आहे. शिवाय झटपट होणारी. त्यामुळे सकाळच्या गडबडीत नाश्त्यासाठी काही झटपट करायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.वेट लॉस टिप्स