lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > तांदूळ नको नी सोडा नको, करा २ डाळींची पौष्टिक इडली, नाश्ता स्पेशल प्रोटीन इडली- सोपी रेसिपी!

तांदूळ नको नी सोडा नको, करा २ डाळींची पौष्टिक इडली, नाश्ता स्पेशल प्रोटीन इडली- सोपी रेसिपी!

Protein-Rich No Rice Idli Recipe डाळ तांदळाचीच इडली करायला पाहिजे असं नाही, तांदुळ न वापरताही करा गरम हलकीफुलकी इडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2023 12:11 PM2023-09-11T12:11:33+5:302023-09-11T13:56:54+5:30

Protein-Rich No Rice Idli Recipe डाळ तांदळाचीच इडली करायला पाहिजे असं नाही, तांदुळ न वापरताही करा गरम हलकीफुलकी इडली

Protein-Rich No Rice Idli Recipe | तांदूळ नको नी सोडा नको, करा २ डाळींची पौष्टिक इडली, नाश्ता स्पेशल प्रोटीन इडली- सोपी रेसिपी!

तांदूळ नको नी सोडा नको, करा २ डाळींची पौष्टिक इडली, नाश्ता स्पेशल प्रोटीन इडली- सोपी रेसिपी!

नाश्त्यामध्ये लोकं आवडीने साऊथ इंडियन पदार्थ खातात. इडली, डोसा, मेदू वडा, अप्पे हे पदार्थ आपण चवीने खातोच. हे सर्व पदार्थ चवीला तर भन्नाट लागतातच, शिवाय हेल्दीही असतात. अनेक फिटनेस फ्रिक लोकं इडली खाण्यास प्राधान्य देतात. पण अनेकदा साऊथ स्टाईल इडली घरात तयार होत नाही. कधी इडली कडक, तर कधी पांढरीशुभ्र तयार होत नाही. इडलीसाठी लागणारं साहित्य भिजवण्यापासून ते वाटण करण्यापर्यंत याची प्रोसेस खूप मोठी आहे.

काही वेळेस तांदूळामुळे इडली व्यवस्थित तयार होत नाही. जर आपल्या घरात इडलीसाठी लागणारं तांदूळ उपलब्ध नसेल तर, आपण तांदुळाशिवाय इडली तयार करू शकता. ही इडली फक्त दोन डाळींचा वापर करून तयार होईल. डाळी आरोग्यासाठी हेल्दी असते, त्यातील प्रोटीनमुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. नाश्त्यासाठी पौष्टिक इडली कशी तयार करायची पाहूयात(Protein-Rich No Rice Idli Recipe).

इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

मूग डाळ

उडीद डाळ

सणावाराला करा ओल्या नारळाची चविष्ट खीर, कमी वेळात - मेहनत न घेता झटपट खीर होईल रेडी

मीठ

कृती

सर्वप्रथम, एका मोठ्या बाऊलमध्ये एक कप मूग डाळ व एक कप उडीद डाळ घ्या. त्यात दोन कप पाणी घालून डाळी चांगली धुवून घ्या. त्यानंतर त्यात २ कप पाणी घालून रात्रभर किंवा ५ ते ६ तासांसाठी भिजत ठेवा. मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली डाळी घालून पेस्ट तयार करा. तयार गुळगुळीत पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घालून हाताने मिक्स करा. पीठ आंबवण्यासाठी त्यावर ५ ते ६ तासांसाठी झाकण ठेवा. यामुळे इडल्या मस्त मऊ - लुसलुशीत तयार होतील.

मुठभर कडीपत्ता - कपभर शेंगदाणे, १० मिनिटात तयार करा चमचमीत कडीपत्त्याची चटणी; वाढेल जेवणाची रंगत

६ तासानंतर चमच्याने किंवा हाताने पीठ मिक्स करा. इडलीच्या साच्याला किंवा छोट्या वाट्यांना तेल लावून ग्रीस करा. व त्यावर चमचाभर इडली पीठ घाला. इडली स्टीमरमध्ये १० ते १२ मिनिटे किंवा ते शिजेपर्यंत वाफवून घ्या. तयार इडली चमच्याने अलगदपणे काढा. अशा प्रकारे तांदुळाचा वापर न करता दोन डाळींची इडली खाण्यासाठी रेडी. आपण ही इडली खोबऱ्याची चटणी किंवा सांबरसह खाऊ शकता.

Web Title: Protein-Rich No Rice Idli Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.