Join us

मुगाची कढी कधी खाल्ली आहे का? कपभर मुगाची करा आंबटगोड कढी, मारा मस्त भुरका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2024 14:07 IST

Protein-Rich Moong Dal Kadhi; A Unique And Light Recipe : ताकाची कढी नेहमी करतो पाहा मुगाच्या कढीची पौष्टिक रेसिपी

उन्हाळा सुरु झाल्यानंतर लोकं दही, ताक, लस्सी प्यायला सुरुवात करतात. या दिवसात कढी देखील तयार करण्यात येते. अनेकांना कढी खायला आवडते. काही लोकं ताकाची कढी तयार करतात. तर, काही लोकं त्यात भजी घालून कढी पकोडा तयार करतात. पण आपण कधी हिरव्या मुगाची कढी खाऊन पाहिली आहे का? हिरव्या मुगाची उसळ, भाजी किंवा आमटी आपण तयार केलीच असेल (Kadhi Recipe). पण हिरव्या मुगाची कढी क्वचित कोणी खाल्ली असेल. हिरवे मूग खाण्याचे अनेक फायदे आहेत (Kitchen Tips).

त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि तांबे यांसारख्या खनिजे आढळतात. याशिवाय यामध्ये फोलेट, फायबर आणि व्हिटॅमिन बी६ देखील असते (Cooking Tips). ज्याचा थेट फायदा आरोग्याला होतो. जर रोजची उसळ खाऊन कंटाळा आला असेल तर, एकदा हिरव्या मुगाची कढी करून पाहा(Protein-Rich Moong Dal Kadhi; A Unique And Light Recipe).

मोड आलेल्या मुगाची कढी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

हिरवे मूग

दही

बेसन

हळद

तेल

लाल तिखट

तोंडी लावण्यासाठी करा हिरव्या टोमॅटोची चटणी; आंबट-गोड चवीची चटणी एकदा खाल तर भूक खवळेल

मोहरी

जिरं

कडीपत्ता

हिंग

हिरवी मिरची

लसूण

कृती

सर्वप्रथम, एक कप हिरवे मूग शिजवून घ्या. नंतर एका बाऊलमध्ये एक २ कप दही आणि थोडं पाणी घालून फेटून घ्या. फेटलेल्या दह्यामध्ये २ चमचे बेसन, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घालून मिक्स करा. गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, जिरं, कडीपत्ता, चिमुटभर हिंग, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ठेचलेला लसूण आणि चिमुटभर हळद घालून परतवून घ्या.

ना ब्रेड-ना चटणी; हाय प्रोटीन नो ब्रेड सँडविचची सोपी कृती; पोट भरेल गच्च-वेट लॉससाठी उत्तम

साहित्य परतवून झाल्यानंतर त्यात शिजलेले हिरवे मूग घालून २ ते ३ मिनिटांसाठी परतवून घ्या. नंतर त्यात फेटलेलं दही, गरजेनुसार पाणी, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर घालून मिक्स करा. मध्यम आचेवर कढी शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे मोड आलेल्या हिरव्या मुगाची कढी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स