बहुतांश शाकाहारी लोकांच्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता असते. त्यामुळे मग शाकाहारी पदार्थांमधून योग्य प्रमाणात प्रोटीन्स मिळत नाहीत अशी उगाच ओरड केली जाते. पण योग्य पदार्थ योग्य प्रमाणात जर तुम्ही खाल्ले तर मग मात्र शरीरातले प्रोटीन्स निश्चितच वाढू शकते. त्यासाठी काय करावं याविषयीचा एक उत्तम उपाय डॉक्टरांनी शेअर केला आहे (protein rich ladoo for vegetarian people). त्यांनी एका खास रेसिपीने लाडू तयार करायला सांगितले आहेत. तो १ लाडू जर तुम्ही रोज सकाळी नियमितपणे खाल्ला तर शरीरातली प्रोटीन्सची कमतरता निश्चितच भरून निघेल..(how to get rid of protein deficiency?)
प्रोटीनयुक्त लाडूंची खास रेसिपी
प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत असणारे खास लाडू घरच्याघरी कसे तयार करावेत, याची रेसिपी डॉक्टरांनी vaidicayurvedpanchkarma1 या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
हे लाडू तयार करण्यासाठी अर्धी वाटी मूग, अर्धी वाटी शेंगदाणे, पाव वाटी काळे तीळ आणि पाव वाटी जवस घ्या.
पुरणासाठी डाळ शिजवताना पाणी जास्त होतं, कुकरमधून फसफसून बाहेर येतं? २ टिप्स- पुरण होईल परफेक्ट
गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि हे सगळे पदार्थ मंद ते मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घ्या.
भाजून घेतलेले सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर ते मिक्सरमधून जाडेभरडे फिरवून घ्या.
यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तूप घाला. तूप वितळल्यानंतर त्यामध्ये साधारण ३० ते ४० ग्रॅम एवढा गूळ घाला.
पोटाचा- कंबरेचा घेर वाढतच चालला? ७ गोष्टी तातडीने करा- वाढलेलं वजन लगेच उतरेल
गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये मिक्सरमधून फिरवलेले सारण घाला. सगळं एकदा व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या. यानंतर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे लाडू वळा. हा लाडू रोज सकाळी घ्या.
Web Summary : Vegetarians often lack protein. This recipe for protein-rich ladoos, shared by doctors, helps overcome protein deficiency. Made with moong, peanuts, sesame, and flax seeds, one ladoo daily can boost protein levels.
Web Summary : अक्सर शाकाहारियों में प्रोटीन की कमी होती है। डॉक्टरों द्वारा साझा की गई प्रोटीन से भरपूर लड्डू की यह रेसिपी प्रोटीन की कमी को दूर करने में मदद करती है। मूंग, मूंगफली, तिल और अलसी से बने, रोजाना एक लड्डू प्रोटीन के स्तर को बढ़ा सकता है।