Join us
Daily Top 2Weekly Top 5

भरपूर प्रोटीन देणारा सगळ्यात स्वस्त पदार्थ- पाहा रेसिपीही चविष्ट! महागड्या प्रोटीन पावडर विसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2026 14:34 IST

Protein Rich Recipe For Breakfast: भरपूर प्रोटीन देणाऱ्या एका स्वस्तात मस्त घरगुती पदार्थाची ही घ्या सोपी रेसिपी.. 

बहुसंख्य भारतीय लोकांच्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता दिसून येते. त्यातही जे लोक शाकाहारी आहेत त्यांना प्रोटीनची खूप जास्त गरज असते. आता प्रोटीनची गरज भागवायची असेल तर विकत मिळणारे महागडे प्रोटीन पावडर किंवा प्रोटीन शेकच घ्यायला पाहिजेत असं मुळीच नाही. आपल्या स्वयंपाक घरात काही अगदी स्वस्तात मस्त पदार्थ असे आहेत की जे भरपूर प्रमाणात प्रोटीन देतात आणि दिवसभरातली आपली प्रोटीन्सची कमतरता बऱ्यापैकी भागवू शकतात. त्यापैकी एक पदार्थ म्हणजे एक सोया चंक आणि बेसन घालून केलेलं एक खास प्रकारचं धिरडं किंवा पराठा. हे धिरडं किंवा पराठा कसा करायचा त्याची ही खास रेसिपी...(Protein Rich Recipe For Breakfast)

सोया चंक- बेसन धिरडे रेसिपी 

 

साहित्य 

१ वाटी सोया चंक आणि १ वाटी बेसन 

चवीनुसार लाल तिखट आणि मीठ 

पौष्टिक असते म्हणून काकडी कधीही खाऊ नये- पाहा काकडी खाण्याची योग्य वेळ कोणती

धणेपूड आणि जिरेपूड प्रत्येकी १ टीस्पून आणि १ टीस्पून पांढरे तीळ 

कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, पत्ताकोबी आणि इतर तुमच्या आवडीच्या भाज्या एक वाटी

कृती 

 

सोया चंक्स मिक्सरमधून बारीक करून घ्या आणि त्याची पावडर करा, 

आता त्यामध्ये बेसन पीठ घाला. चवीनुसार लाल तिखट, मीठ, जिरेपूड, धनेपूडही घाला. 

कांदा, टोमॅटो यासोबतच तुमच्या आवडीच्या भाज्या बारीक चिरून किंवा किसून घाला. आणखी छान चव येण्यासाठी तुम्ही यामध्ये आलं- लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्टही घालू शकता. 

ओठांभोवतीची त्वचा, कपाळ काळसर दिसतं? पिगमेंटेशनही वाढलं, घ्या उपाय- १५ दिवसांत त्वचा होईल उजळ, नितळ

आता पाणी किंवा दही घालून हे पीठ कालवून घ्या. त्यानंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवा. त्याला थोडं तूप लावा आणि नेहमी जसं धिरडं करतो त्याप्रमाणे या पिठाचे धिरडे करा. 

हे धिरडे सकाळी नाश्त्याला दह्यासोबत खा. दोन धिरडे आणि एक वाटी दही असं रोज खाल्लं तरी तुमच्या शरीरातली प्रोटीनची कमतरता बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : High-protein, affordable food: Soya-besan recipe beats expensive protein powders.

Web Summary : Combat protein deficiency with soya and besan dhirde. This simple recipe uses soya chunks, besan, vegetables, and spices to create a protein-rich, affordable alternative to costly supplements. Enjoy with yogurt for breakfast.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.