lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > ब्रेकफास्टला १० मिनीटांत करा स्पेशल डोसा, भरपूर प्रोटीन- चविष्ट नाश्ता...

ब्रेकफास्टला १० मिनीटांत करा स्पेशल डोसा, भरपूर प्रोटीन- चविष्ट नाश्ता...

Protein Rich Breakfast Dosa Recipe : भूक भागवणारा, जिभेचे चोचले पुरवणारा आणि तरीही अतिशय हेल्दी असा चविष्ट प्रोटीन डोसा कसा करायचा ते पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2022 02:23 PM2022-08-11T14:23:54+5:302022-08-11T14:28:22+5:30

Protein Rich Breakfast Dosa Recipe : भूक भागवणारा, जिभेचे चोचले पुरवणारा आणि तरीही अतिशय हेल्दी असा चविष्ट प्रोटीन डोसा कसा करायचा ते पाहूया...

Protein Rich Breakfast Dosa Recipe : Make breakfast in 10 minutes special dosa, rich in protein- delicious breakfast... | ब्रेकफास्टला १० मिनीटांत करा स्पेशल डोसा, भरपूर प्रोटीन- चविष्ट नाश्ता...

ब्रेकफास्टला १० मिनीटांत करा स्पेशल डोसा, भरपूर प्रोटीन- चविष्ट नाश्ता...

Highlightsहे डोसे दही, सॉस किंवा हिरवी चटणी असे कशासोबतही अतिशय चविष्ट लागतात. दाणे, डाळीचे पीठ, दही, भाज्या हे सगळेच प्रोटीनचा उत्तम स्रोत असते.

आपला आहार चौरस असेल तर आपली तब्येत चांगली राहण्यास मदत होते. यामध्ये कर्बोदके, जीवनसत्त्वे, स्निग्ध पदार्थ, खनिजे, कॅल्शियम, लोह, प्रथिने अशा सगळ्या गोष्टींचा योग्य प्रमाणात समावेश असायला हवा. यातील प्रथिने हाडांच्या आरोग्यासाठी, स्नायूंच्या बांधणीसाठी तसेच शरीराची प्रतिकारशक्ती चांगली राहावी यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. सकाळच्या पहिल्या आहारात प्रोटीन जास्त प्रमाणात असली तर शरीरात ताकद यायला मदत होते. तसेच दिर्घ काळ पोट भरलेले राहावे यासाठी प्रथिने अतिशय उपयुक्त ठरतात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांसाहार, ठराविक भाज्या, शेंगा, डाळी, कडधान्ये यांमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे या गोष्टींचा नाश्त्यात समावेश हवा असे आवर्जून सांगितले जाते (Protein Rich Breakfast Dosa Recipe). 

(Image : Google)
(Image : Google)

रोज काय नाश्ता करायचा असा प्रश्न तमाम महिलांना पडतो. सतत पोहे, उपीट खाऊनही आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी थोडे वेगळे काही केल्यास त्यामुळे शरीराला प्रोटीन्स तर मिळतातच पण नाश्त्याचा प्रश्नही सुटतो. आता असा कोणता पदार्थ आहे जो कमी वेळात आणि झटपट तयार होतो. तसेच चविष्ट असल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने  खातात. रात्रभर आपल्या शरीराची क्रिया वेगाने चालू असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर आपल्याला भूक लागते. भूक भागवणारा, जिभेचे चोचले पुरवणारा आणि तरीही अतिशय हेल्दी असा चविष्ट प्रोटीन डोसा कसा करायचा ते पाहूया...

साहित्य 

१. हरभरा डाळीचे पीठ (बेसन) - १ वाटी 

२. दाणे - अर्धी वाटी

३. मिरची - लसूण पेस्ट - १ चमचा 

४. कांदा - १ चिरलेला 

५. गाजर - १ किसलेले

६. बीट - १ किसलेले 

७. कडीपत्ता - ५ ते ६ पाने 

८. कोथिंबीर - अर्धी वाटी - चिरलेली 

९. मीठ - चवीपुरते. 

१०. दही - २ चमचे

११. तेल - पाव वाटी

(Image : Google)
(Image : Google)

कृती 

१. अर्धी वाटी दाणे रात्री झोपताना भिजत घालावे.

२. सकाळी उठल्यावर भिजलेले दाणे, मिरची, कडीपत्ता, लसूण सगळे मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.

३. डाळीच्या पीठात दही, मिक्सर केलेली पेस्ट घालावी. 

४. यामध्ये बारीक चिरलेला कांदा, किसलेले गाजर, बीट घालावे. 

५. कोथिंबीर आणि मीठ घालून पीठ या पीठात पाणी घालून ते घट्टसर भिजवून घ्यावे. 

६. यामध्ये आपण आवडीनुसार कोबी, बटाटा, पालक अशा आपल्या आवडीच्या आणि उपलब्ध असतील त्या कोणत्याही भाज्या घालू शकतो. 

७. घट्टसर भिजवलेले हे पीठ १० मिनीटे बाजूला ठेवून द्यावे.

८. तव्यावर तेल घालून त्यावर हे पीठ घालून पातळ डोसे घालावेत.

९. हे डोसे दही, सॉस किंवा हिरवी चटणी असे कशासोबतही अतिशय चविष्ट लागतात. 

Web Title: Protein Rich Breakfast Dosa Recipe : Make breakfast in 10 minutes special dosa, rich in protein- delicious breakfast...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.