Lokmat Sakhi >Food > थकवा, कमजोरी दूर करण्यासाठी महत्वाचं ठरतं प्रोटीन, शाकाहारी लोकांसाठी बेस्ट ठरतात 'हे' पर्याय...

थकवा, कमजोरी दूर करण्यासाठी महत्वाचं ठरतं प्रोटीन, शाकाहारी लोकांसाठी बेस्ट ठरतात 'हे' पर्याय...

Protein Rich Foods : प्रोटीनमुळे स्नायू मजबूत तर होतातच, सोबतच शरीराला ऊर्जा मिळते आणि हार्मोन्सही नियंत्रित होतात. अशात तुम्ही जर शाकाहारी असाल आणि प्रोटीनची कमतरता भरून काढायची असेल तर काय खावं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 09:55 IST2025-06-07T09:54:43+5:302025-06-07T09:55:21+5:30

Protein Rich Foods : प्रोटीनमुळे स्नायू मजबूत तर होतातच, सोबतच शरीराला ऊर्जा मिळते आणि हार्मोन्सही नियंत्रित होतात. अशात तुम्ही जर शाकाहारी असाल आणि प्रोटीनची कमतरता भरून काढायची असेल तर काय खावं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Protein is important to eliminate fatigue and weakness, these options are best for vegetarians | थकवा, कमजोरी दूर करण्यासाठी महत्वाचं ठरतं प्रोटीन, शाकाहारी लोकांसाठी बेस्ट ठरतात 'हे' पर्याय...

थकवा, कमजोरी दूर करण्यासाठी महत्वाचं ठरतं प्रोटीन, शाकाहारी लोकांसाठी बेस्ट ठरतात 'हे' पर्याय...

Protein Rich Foods : प्रोटीन शरीरासाठी खूप महत्वाचं असतं तत्व असतं. जर शरीराला पुरेसं प्रोटीन मिळालं नाही तर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. कमजोरी, सतत थकवा, जखम भरायला वेळ लागणे, भूक जास्त लागणं, इम्यूनिटी कमजोर होणं, तसेच केस, नखं आणि त्वचेमध्ये समस्या होणं ही शरीरात प्रोटीन कमी असल्याची लक्षणं असू शकतात. त्यामुळे तुम्हाला नेहमीच फिट रहायचं असेल आणि या होऊ द्यायच्या नसेल तर प्रोटीन अधिक घ्यावं लागेल. प्रोटीनमुळे स्नायू मजबूत तर होतातच, सोबतच शरीराला ऊर्जा मिळते आणि हार्मोन्सही नियंत्रित होतात. अशात तुम्ही जर शाकाहारी असाल आणि प्रोटीनची कमतरता भरून काढायची असेल तर काय खावं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शेवग्याची पानं

शेवग्याच्या पानांचं पावडर बनवून त्याचं सेवनही करू शकता. शेवग्याचं पावडरच नाही तर शेवग्याच्या शेंगा आणि फुलंही खाऊ शकता. शेवग्याचं पावडर तुम्ही ज्यूस, नारळ पाण्यात टाकूनही पिऊ शकता. एक चमचा पावडर, त्यात थोडा लिंबाचा रस टाकूनही सेवन करू शकता. याने किडनी आणि लिव्हर डिटॉक्स होतं. तसंच यातून तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळतं.

प्रोटीन - कॅल्शिअमचा खजिना

यूएसडीएनुसार, १०० ग्रॅम शेवग्याच्या पावडरमध्ये ३३ ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन असतं. इतकं प्रोटीन अंड्यामध्येही नसतं. हाडे मजबूत करण्यासाठी शेवग्याच्या पानाचं पावडर फार फायदेशीर ठरतं. कारण यात भरपूर कॅल्शिअम असतं.

प्रोटीन मिळवण्याचे इतरही पर्याय

मूग डाळ

तूर डाळीनंतर मूग डाळ ही सगळ्यात फायदेशीर मानली जाते. या डाळीच्या सेवनाने शरीराला प्रोटीन तर मिळतंच, सोबतच तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते. या डाळीच्या सेवनाने पोटाच्या अनेक समस्याही दूर होतात. तसेच या डाळीने शरीरात ब्लड सर्कुलेशनही सुरळीत होतं.

उडीद डाळ

उडीद डाळ अनेक दृष्टीने शरीरासाठी फायदेशीर मानली जाते. या डाळीमध्ये प्रोटीनसोबतच व्हिटॅमिन बी सुद्धा भरपूर असतं. जर प्रोटीनची कमतरता दूर करायची असेल तर या डाळीचा रोजच्या आहारात समावेश करावा. तसेच या डाळीमध्ये फोलिक अ‍ॅसिड, आयर्न, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखे पोषक तत्वही भरपूर असतात. ज्यामुळे तुमचं पचन तंत्र मजबूत राहतं.

तूर डाळ

तूर डाळीमध्येही प्रोटीन भरपूर असतं. इतकंच नाही तर या डाळीमध्ये फायबर फोलिक अ‍ॅसिड, आयर्न आणि कॅल्शिअमही भरपूर असतं. ही डाळ रोज खाल्ल्याने शरीरातील प्रोटीन वाढतं. तसेच तूर डाळीच्या सेवनाने डायबिटीस आणि हृदयरोग कंट्रोल करण्यासही मदत मिळते. तसेच तूर डाळीचं पाणी सेवन केल्याने शरीराला एनर्जी मिळते.

Web Title: Protein is important to eliminate fatigue and weakness, these options are best for vegetarians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.