Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > प्रेशर कुकरचा स्फोट होण्यापूर्वी हमखास दिसतात ६ लक्षणं, ९०% लोक करतात एक चूक...

प्रेशर कुकरचा स्फोट होण्यापूर्वी हमखास दिसतात ६ लक्षणं, ९०% लोक करतात एक चूक...

pressure cooker blast warning signs : pressure cooker safety tips : signs before pressure cooker blast : pressure cooker danger signs : प्रेशर कुकर फुटण्याआधी कोणते खास संकेत देतो आणि त्याकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2026 18:40 IST2026-01-19T18:40:00+5:302026-01-19T18:40:01+5:30

pressure cooker blast warning signs : pressure cooker safety tips : signs before pressure cooker blast : pressure cooker danger signs : प्रेशर कुकर फुटण्याआधी कोणते खास संकेत देतो आणि त्याकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात...

pressure cooker blast warning signs pressure cooker safety tips signs before pressure cooker blast pressure cooker danger signs | प्रेशर कुकरचा स्फोट होण्यापूर्वी हमखास दिसतात ६ लक्षणं, ९०% लोक करतात एक चूक...

प्रेशर कुकरचा स्फोट होण्यापूर्वी हमखास दिसतात ६ लक्षणं, ९०% लोक करतात एक चूक...

'प्रेशर कुकर' हे प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचे भांडं आहे. डाळ, भात किंवा भाजी झटपट शिजवण्यासाठी आपण कुकरचा वापर हमखास करतो. सध्याच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये प्रेशर कुकर हा स्वयंपाकघरातील अत्यंत उपयुक्त आणि वेळ वाचवणारा उपकरण आहे. पण हाच कुकर योग्य काळजी न घेतल्यास एखाद्या बॉम्बसारखा घातक ठरू शकतो. कुकरचा स्फोट होण्याच्या घटना केवळ निष्काळजीपणामुळे घडतात(pressure cooker blast warning signs).

प्रेशर कुकरमध्ये, चुकीचा वापर, दुर्लक्ष किंवा वेळेवर संकेत ओळखले नाहीत तर प्रेशर कुकर धोकादायक ठरू शकतो. प्रेशर कुकरचा चुकीचा वापर, दुर्लक्ष किंवा वेळेवर संकेत ओळखले नाहीत तर प्रेशर कुकर धोकादायक ठरू शकतो. अनेकवेळा कुकर फुटण्याआधी तो काही सूचक आवाज, वाफेतील बदल, शिट्टीची अडचण किंवा झाकणातील बिघाड असे स्पष्ट संकेत देत असतो, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अनेकदा कुकर ( pressure cooker danger signs) फुटण्यापूर्वी तो आपल्याला काही विशिष्ट संकेत देत असतो, पण माहितीअभावी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हे संकेत वेळीच ओळखले तर आपण मोठी दुर्घटना टाळू शकतो. प्रेशर कुकर फुटण्याआधी कोणते खास (signs before pressure cooker blast) संकेत देतो आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास नेमके काय होऊ शकते ते पाहा. 

कुकर फुटण्यापूर्वी मिळणारे 'हे' ६ धोकेदायक संकेत... 

१. शिटीमधून वाफ न येता झाकणाच्या कडेने वाफ बाहेर येणे :- जर कुकरची शिटी वाजण्याऐवजी झाकणाच्या कडेने (Gasket च्या बाजूने) मोठ्या प्रमाणात वाफ बाहेर येत असेल, तर समजावे की कुकरमध्ये बिघाड आहे. गॅस्केट (रबर) जुने झाले असेल किंवा सैल झाले असेल, तर दाब नीट तयार होत नाही आणि अचानक दबाव वाढून कुकर फुटण्याची शक्यता असते.

२. शिटीचा आवाज बदलणे किंवा शिटी अडकणे :- कुकरची शिटी नियमितपणे आणि मोकळेपणाने वाजणे गरजेचे आहे. जर शिटीतून वाफ येताना वेगळा किंवा शिट्टी वाजताना अडखळल्यासारखा आवाज येत असेल, तर याचा अर्थ शिटीच्या पाईपमध्ये अन्नाचे कण (उदा. डाळ किंवा तांदूळ) अडकले आहेत. वाफ बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला की आत प्रचंड दाब निर्माण होतो आणि कुकरचा स्फोट होऊ शकतो.

मेदू वडा कुरकुरीत होण्यासाठी उडपी अण्णा वापरतात खास ट्रिक्स! घरीच करा विकतसारखेच परफेक्ट गोल गरगरीत वडे... 

३. कुकरच्या तळाचा किंवा झाकणाचा आकार बदलणे :- जर तुम्हाला तुमच्या कुकरचा तळ (Base) थोडा फुगल्यासारखा वाटत असेल किंवा झाकण बसवताना पूर्वीसारखे नीट बसत नसेल, तर हा सर्वात मोठा धोक्याचा इशारा आहे. कुकरच्या धातूची ताकद कमी झाली की जास्त दाबामुळे त्याचा आकार बदलतो. असा वाकडा झालेला कुकर वापरणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.

४. गरजेपेक्षा जास्त शिट्ट्या होणे :- जेव्हा तुम्ही कुकरमध्ये काही शिजवायला ठेवता आणि तो खूप वेगाने आणि सतत शिट्ट्या देऊ लागतो, तेव्हा गॅस बंद करा. अशावेळी हे समजून घेतले पाहिजे की कुकरच्या आत खूप जास्त प्रेशर निर्माण होत आहे.

प्रेशर कुकरमध्ये करा शिळ्या चपात्या गरम तव्यावर टम्म फुगल्यासारख्या! पाहा एकदम २० चपात्या गरम करण्याची ट्रिक...

वाळलेला 'लकी बांबू प्लांट' होईल पुन्हा हिरवागार, टवटवीत! करा ५ छोटे बदल - बांबू प्लांट दिसेल नव्यासारखेच फ्रेश... 

५. कुकरचे झाकण हलणे किंवा वर उसळून निघणे :- प्रेशर कुकरचे झाकण जर वारंवार किंवा सतत हलत असेल, तर ते धोक्याचे लक्षण असू शकते. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी गॅस बंद करा, वाफ पूर्णपणे बाहेर पडू द्या आणि त्यानंतरच कुकर उघडून तपासा.

६. विचित्र आवाज किंवा जळल्याचा वास येणे:- कुकरमधून शिट्टी व्यतिरिक्त काही असामान्य आवाज येत असेल किंवा काहीतरी जळल्यासारखा उग्र वास येत असेल, तर तो कुकर फुटण्यापूर्वीचा एक महत्त्वाचा इशारा असू शकतो. शिट्टी वारंवार अडकणे हे देखील धोक्याचे लक्षण आहे.

प्रेशर कुकरचा स्फोट होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ? 

१. व्हेंट पाईप ब्लॉक होऊ देऊ नका :- अनेकदा जेवण बनवल्यानंतर योग्य प्रकारे स्वच्छता न केल्यामुळे व्हेंट पाईप ब्लॉक होतो. अशा परिस्थितीत कुकरच्या आतील वाफ बाहेर पडू शकत नाही. यामुळे कुकरमधील दाब वाढल्याने तो फुटू शकतो. म्हणून नेहमी या गोष्टीकडे लक्ष द्या.

२. सेफ्टी वॉल्व एका वर्षात बदला :- जर तुम्हाला किचनमध्ये कुकरमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये असे वाटत असेल, तर तुम्ही सेफ्टी वॉल्व वर्षातून एकदा बदलला पाहिजे. हे कुकरला फुटण्यापासून वाचवते. जेव्हा व्हेंट पाईप ब्लॉक होतो, तेव्हा सेफ्टी वॉल्व फुटतो आणि अतिरिक्त वाफ बाहेर काढून टाकतो.

३. विचित्र संकेतांकडे लक्ष द्या :- कुकरमधून असामान्य आवाज येणे किंवा जळल्याचा वास येणे हा स्फोटाचा पूर्वसंकेत असू शकतो, अशा वेळी त्वरित सावध व्हावे.

Web Title : प्रेशर कुकर विस्फोट: 6 संकेत, 90% लोग करते हैं यह गलती!

Web Summary : प्रेशर कुकर जरूरी है, पर लापरवाही से खतरनाक हो सकता है। किनारों से भाप निकलना, सीटी की समस्या, आकार में बदलाव, अत्यधिक सीटी, ढक्कन हिलना और जलने की गंध जैसे संकेतों पर ध्यान दें। नियमित रूप से वेंट पाइप साफ करें, सुरक्षा वाल्व को सालाना बदलें और विस्फोट से बचने के लिए चेतावनी संकेतों पर ध्यान दें।

Web Title : Pressure cooker explosion: 6 signs, 90% make this mistake!

Web Summary : Pressure cookers are essential but can be dangerous if neglected. Watch for steam escaping from the sides, whistling issues, shape changes, excessive whistling, lid movement, and burning smells. Regularly clean the vent pipe, replace the safety valve yearly, and heed warning signs to prevent explosions.