Join us
Daily Top 2Weekly Top 5

बटाट्याचे इंस्टंट चिप्स- विकतसारखे कुरकुरीत चटकदार चिप्स आता करा घरीच, घ्या सोपी रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2026 18:00 IST

Potato Chips Recipe: बाजारात विकत मिळतात तसे बटाट्याचे चिप्स घरीच करायचे असतील तर पुढे सांगितलेली रेसिपी एकदा पाहा..(how to make instant potato chips?)

ठळक मुद्देरेसिपी अगदी सोपी असून त्यासाठी खूप काही विशेष तयारी करण्याची गरजही नाही.

बटाट्याचे चिप्स हा अनेकांचा विक पॉईंट. छान कुरकुरीत खमंग चवीचे बटाट्याचे चिप्स समोर आले की ते खाण्याचा मोह कित्येकांना आवरत नाही. मग काही लोक अगदी डाएटही विसरून जातात. असे चिप्स जर तुम्हाला मनापासून आवडत असतील आणि अगदी मनसोक्त खायचे असतील तर पुढे सांगितलेली रेसिपी ट्राय करून पाहा. यामुळे अवघ्या काही मिनिटांतच तुम्ही घरच्याघरीच अगदी उत्तम चिप्स करू शकता (how to make instant potato chips?). रेसिपी अगदी सोपी असून त्यासाठी खूप काही विशेष तयारी करण्याची गरजही नाही.(easy and simple recipe of potato chips)

बटाट्याचे चिप्स करण्याची रेसिपी

 

साहित्य

३ ते ४ मध्यम आकाराचे बटाटे

चवीनुसार लाल तिखट आणि मीठ

बाल्कनीत लावा २ रोपं आणि घरभर दरवळेल सुगंध, घरात प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी सोपा उपाय

थोडासा चाट मसाला आणि तळण्यासाठी तेल

कृती

सगळ्यात आधी तर बटाटे २ ते ३ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्यांची सालं काढून घ्या. यानंतर चिप्स करण्याचं जे स्लायसर असतं त्याच्या मदतीने चिप्स करून घ्या. बटाट्याच्या स्लाईस अगदी पातळ झाल्या पाहिजेत, हे मात्र लक्षात ठेवा. कारण जेवढ्या पातळ स्लाईस होतील तेवढे चिप्स जास्त कुरकुरीत होतील.

 

यानंतर बटाट्याच्या स्लाईस १० ते १५ मिनिटांसाठी  मीठ घातलेल्या थंड पाण्यामध्ये ठेवा. यामुळे बटाट्यामधलं जास्तीचं स्टार्च निघून जातं आणि चिप्सचा कुरकुरीतपणा आणखी वाढतो.

डोक्यात खूपच कोंडा- केसही पातळ झाले? फक्त १ वाटी दही 'या' पद्धतीने लावा, केस गळणं थांबेल

त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि तेल कडक तापल्यानंतर त्यामध्ये बटाट्याच्या स्लाईस तळून घ्या. छान गरमागरम चिप्स तयार. आता या चिप्सवर थोडं तिखट, चाट मसाला घाला. मिठाच्या पाण्यात स्लाईस भिजवत ठेवल्याने त्याला मिठाची चव येतेच. पण गरज पडली तर वरून थोडं मीठही घाला. छान चटकदार, कुरकुरीत, खमंग चिप्स तयार. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Instant Potato Chips: Crispy, tasty homemade recipe, ready in minutes!

Web Summary : Craving crispy potato chips? This easy recipe lets you make delicious, crunchy chips at home in minutes. Simple ingredients and quick preparation!
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.