Lokmat Sakhi >Food > पोह्याच्या पुऱ्या करा पोह्याच्या पुऱ्या! कांदेपोहे खाताच, मात्र पोह्याचा हा पदार्थ पावसाळा स्पेशल...

पोह्याच्या पुऱ्या करा पोह्याच्या पुऱ्या! कांदेपोहे खाताच, मात्र पोह्याचा हा पदार्थ पावसाळा स्पेशल...

Poha Masala Puri : How To Make Poha Masala Puri At Home : Poha Masala Puri Recipe : पावसाळ्यात गरमागरम चहा आणि पोह्यांच्या पुऱ्यांचा झक्कास बेत किमान एकदा तरी करुन पाहायलाच हवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2025 19:33 IST2025-07-08T19:27:51+5:302025-07-08T19:33:27+5:30

Poha Masala Puri : How To Make Poha Masala Puri At Home : Poha Masala Puri Recipe : पावसाळ्यात गरमागरम चहा आणि पोह्यांच्या पुऱ्यांचा झक्कास बेत किमान एकदा तरी करुन पाहायलाच हवा.

Poha Masala Puri How To Make Poha Masala Puri At Home Poha Masala Puri Recipe | पोह्याच्या पुऱ्या करा पोह्याच्या पुऱ्या! कांदेपोहे खाताच, मात्र पोह्याचा हा पदार्थ पावसाळा स्पेशल...

पोह्याच्या पुऱ्या करा पोह्याच्या पुऱ्या! कांदेपोहे खाताच, मात्र पोह्याचा हा पदार्थ पावसाळा स्पेशल...

आपल्याकडे बऱ्याच घरांमध्ये सकाळच्या नाश्त्याला हमखास पोहे केले जातात. खरंतर, पोहे घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. पोहे करायला सोपे, आणि अगदी घाई गडबडीच्या वेळी देखील झटपट तयार होतात, म्हणून पोहे (Poha Masala Puri Recipe) हा सकाळचा सगळ्यात सोपा आणि बेस्ट नाश्त्याचा प्रकार (Poha Masala Puri) आहे. परंतु काहीवेळा नेहमीचे तेच ते पोहे खाऊन कंटाळा येतो, काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते. अशावेळी याच पोह्यांचे काहीतरी वेगळं आणि खमंग तयार करायचं असेल, तर पोह्यांच्या कुरकुरीत पुऱ्या हा एक मस्त, उत्तम पर्याय ठरतो(How To Make Poha Masala Puri At Home).

घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात, कमी वेळात तयार होणाऱ्या या पुऱ्या चविष्ट, झणझणीत आणि नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट असतात. विशेषतः पावसाळ्यात गरमागरम चहा आणि पोह्यांच्या पुऱ्यांचा झक्कास बेत किमान एकदा तरी करुन पाहायलाच हवा. मुसळधार कोसळणाऱ्या पावसात झटपट तयार करता येणाऱ्या पोह्यांच्या पुऱ्यांची झटपट रेसिपी पाहूयात.   

साहित्य :- 

१. पोहे - १ कप 
२. गव्हाचं पीठ - १/२ कप 
३. बेसन - १/२ कप 
४. मीठ - चवीनुसार
५. हळद - १/२ टेबलस्पून 
६. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून 
७. धणेपूड - १/२ टेबलस्पून
८. जिरे - १ टेबलस्पून 
९. ओवा - १/२ टेबलस्पून 
१०. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली) 
११. पाणी - गरजेनुसार


कृती :- 

१. एका मोठ्या बाऊलमध्ये पोहे घेऊन ते पाण्याने २ वेळा स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर, पोह्यातील पाणी काढून ते ५ ते १० मिनिटांसाठी झाकून ठेवून द्यावे. 
२.आता हे पोहे मऊ झाल्यावर हाताने हलकेच दाब देत मळून घ्यावेत. मळून घेतलेल्या पोह्यात गव्हाचे पीठ, बेसन, चवीनुसार मीठ, हळद, लाल मिरची पावडर, धणेपूड, जिरे, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 

गरमगरम मऊ लुसलुशीत लोणी स्पंज डोसा करण्याची पाहा परफेक्ट पद्धत आणि प्रमाण, पावसाळ्यातली मेजवानी...

कणीक भिजवून फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर कणीक भिजवायला ‘हे’ पाणी वापरा, काळी पडणार नाही...

३. आता हे सगळे मिश्रण एकजीव करून थोडे थोडे पाणी घालून नेहमीप्रमाणे पीठ मळून घ्यावे. पीठ मळून झाल्यावर ५ ते १० मिनिटे पीठ झाकून ठेवावे. 
४. मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करुन त्याच्या पुऱ्या लाटून घ्यावा. 
५. कढईत तेल व्यवस्थित गरम करून, या तेलात पुऱ्या सोडून दोन्ही बाजुंनी व्यवस्थित खरपूस तळून घ्याव्यात. पुऱ्यांना हलका सोनेरी - गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत पुऱ्या मंद आचेवर तळून घ्याव्यात. 

मस्त गरमागरम पुऱ्या वाफाळता चहा किंवा लोणच्या सोबत खाऊ शकता. सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळचा टी - टाइम स्नॅक्स म्हणून आपण या खमंग पुऱ्या करु शकतो. मुसळदार कोसळणाऱ्या पावसात अशा चटपटीत, खमंग पोह्यांच्या कुरकुरीत, खुसखुशीत पुऱ्या खाण्याचा मनमुराद आनंद लुटा.

Web Title: Poha Masala Puri How To Make Poha Masala Puri At Home Poha Masala Puri Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.