Join us

Poha Chivda : ना पोहे आकसणार ना तेलकट होणार; पोह्यांचा चिवडा करण्याची खास रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 11:45 IST

Poha Chivda Recipe : पोहे करण्याच्या व्यवस्थित स्टेप्स फॉलो केल्या तर पोह्यांचा चिवडा खूपच छान परफेक्ट होईल.

गणपतीच्या (Ganpati 2025) दिवसांत फराळाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पाहूण्यांना डिशमध्ये देण्यासाठी नेहमी बाहेरून फरसाण आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी बनवलेले पदार्थ देऊ शकता. पातळ पोह्यांचा चिवडा बनवणं एकदम सोपं आहे. पोहे आकसतात, मऊ पडतात अशी अनेकांची तक्रार असते पण पोहे करण्याच्या व्यवस्थित स्टेप्स फॉलो केल्या तर पोह्यांचा चिवडा खूपच छान परफेक्ट होईल. पोह्यांचा चिवडा करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Easy Way To Make Patal Pohe Chivda)

साहित्य

पातळ पोहे - २ कप

शेंगदाणे - १/२ कप

सुके खोबऱ्याचे काप - १/४ कप

डाळ (फुटाणे) - १/४ कप

कढीपत्ता - १५-२० पानं

हिरवी मिरची - २-३ (बारीक चिरलेली)

हळद - १/२ चमचा

हिंग - चिमूटभर

मोहरी - १/२ चमचा

तेल - २-३ चमचे

पिठीसाखर - १ चमचा

मीठ - चवीनुसार

पातळ पोह्यांचा चिवडा करण्याची खास रेसिपी

१. पोहे भाजून घ्या: एका मोठ्या कढईत मंद आचेवर पातळ पोहे साधारण ५-७ मिनिटे कोरडेच भाजून घ्या. पोहे कुरकुरीत झाले की एका मोठ्या भांड्यात काढून घ्या.

२. फोडणी तयार करा: त्याच कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून परता.

३. शेंगदाणे आणि खोबरे तळा: आता त्यात शेंगदाणे आणि सुके खोबऱ्याचे काप घालून मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.

४. डाळ आणि हळद घाला: शेंगदाणे आणि खोबरे भाजल्यावर त्यात डाळ (फुटाणे) घालून एक मिनिट परता. त्यानंतर हळद आणि मीठ घालून चांगले मिसळा.

५.पोहे मिसळा: आता गॅस बंद करा आणि हे फोडणीचे मिश्रण भाजलेल्या पोह्यांवर घाला.

६. साखर घाला : चिवड्याला हलकीशी गोडसर चव देण्यासाठी वरून पिठीसाखर घालून सर्व साहित्य चांगले मिसळा. चिवडा कुरकरीत होण्यासाठी पोहे मंद आचेवरच भाजा. जर ते कच्चे राहिले तर चिवडा नरम पडू शकतो .खोबरं भाजताना काळजी घ्या.खोबरं लवकर भाजतं, त्यामुळे ते जळणार नाही याची काळजी घ्या.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.गणपती उत्सव २०२५