Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळा वाळवण रेसिपी : पोहे - बटाट्याची चकली तेलात टाकताच फुलते, पाहा सोपी पारंपरिक रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2026 16:22 IST

Poha - Batata Chakli Recipe : How To Make Poha - Potato Chakli Recipe : पोहे - बटाट्याची पांढरीशुभ्र आणि खुसखुशीत चकली करण्याची पारंपरिक रेसिपी...

उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात लगबग सुरू होते ती म्हणजे 'वाळवणाच्या' पदार्थांची. पापड, कुरडया आणि सांडगे यांच्या रांगेत मानाचे स्थान असलेला पदार्थ म्हणजे 'चकली'. सहसा चकली म्हटलं की भाजणी दळणे, पीठ उकडणे या कटकटी डोळ्यासमोर येतात. पण, जर हीच चकली अगदी कमी मेहनतीत आणि झटपट बनवता आली तर... घरच्याघरी कुरकुरीत आणि चविष्ट चकली बनवायची असेल, तर पोहे आणि बटाटा वाळवणाची चकली हा एक भन्नाट पर्याय ठरू शकतो(Poha - Batata Chakli Recipe).

पोह्यांमुळे चकली हलकी आणि कुरकुरीत होते, तर बटाट्याच्या वाळवणामुळे तिची चव अधिकच लज्जतदार बनते. सणासुदीला किंवा चहासोबत खाण्यासाठी हा एक परफेक्ट पदार्थ आहे. पोहे - बटाटा वाळणाची चकली' ही चकली बनवायला जितकी सोपी आहे, चवीला तितकीच खुसखुशीत आणि हलकी लागते. विशेष म्हणजे, पोहे आणि बटाट्याचे हे कॉम्बिनेशन तेलात टाकल्याबरोबर दुपटीने फुलते. तेलात टाकल्याबरोबर फुलासारखी उमलणारी आणि लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण आवडीने खातील अशी ही चकली यंदाच्या उन्हाळ्यात तुमच्या वाळवणातील बेस्ट पदार्थ ठरणार आहे. पोहे - बटाट्याची पांढरीशुभ्र आणि (How To Make Poha - Potato Chakli Recipe) खुसखुशीत चकली करण्याची पारंपरिक रेसिपी पाहूयात.

साहित्य :-

१. पोहे - १/२ किलो२. बटाटे - ५ ते ६ (उकडलेले बटाटे)३. पापड खार - १ टेबलस्पून ४. मीठ - चवीनुसार ५. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून

कृती :- 

१. सगळ्यातआधी पोहे पाण्याने स्वच्छ धुवून ते ५ ते १० मिनिटे पाण्यांत भिजत ठेवावेत. पाण्यांत भिजवून पोहे पूर्णपणे मऊ - लुसलुशीत करून घ्यावेत. २. पोहे पाण्यात भिजल्यावर त्यातील जास्तीचे पाणी काढून पोहे हाताने कुस्करून त्याचा लगदा करून पीठ मळून घ्यावे. आपण बारीक जाळीच्या चाळणीवर देखील हे पोहे हलकेच दाब देऊन त्याचा लगदा करु शकता. ३. बटाटे उकडवून ते बटाटे देखील किसणीवर किसून त्याचा किस तयार करून घ्यावा. 

पोहे - बटाट्याची चकली करण्याची सोपी रेसिपी jayas_foody_family_2020 या इंस्टाग्राम व्हिडिओ वरुन शेअर करण्यात आली आहे. 

उन्हाळा स्पेशल झणझणीत कैरीचं पिठलं! भाकरीसोबत लागेल मस्त - एकदा खा, चव विसरणार नाही... 

४. एका मोठ्या पातेल्यात पोह्यांचा लगदा आणि किसलेल्या बटाट्याचा किस एकत्रित करून त्यात चवीनुसार मीठ, पापड खार, लाल तिखट मसाला घालावा. सगळे जिन्नस कालवून पीठ तयार करून घ्यावे. ५. चकली पाडण्याच्या साच्यात हे तयार पीठ घालूंन गोलाकार चकल्या पाडून घ्याव्यात. या चकल्या ३ ते ४ दिवस उन्हांत व्यवस्थित वाळवून घ्याव्यात. 

चकल्या संपूर्णपणे वाळल्यानंतर त्या हवाबंद डब्यांत भरून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवाव्यात. आपल्या आवडीनुसार, तेलात तळून कुरकुरीत, खुसखुशीत चकल्या खाव्यात.

English
हिंदी सारांश
Web Title : Easy Summer Recipe: Crispy Poha-Potato Chakli That Puffs Up Instantly

Web Summary : Make crispy chakli easily with poha and potato this summer! This traditional recipe uses simple ingredients. The chaklis puff up beautifully when fried. Enjoy this delicious snack during festivals or with tea.
टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल