Join us
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडच्या मुलांनी पंतप्रधानांना भेट म्हणून दिलेले पदार्थ व्हायरल, भारतभर लोक शोधत असलेल्या पदार्थांची रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2026 16:19 IST

PM Modi relishes Chhattisgarh's local snacks thethri and khurmi during 9th edition of ‘Pariksha pe Charcha : PM Modi relishes Thethri and Khurmi during Pariksha Pe Charcha : पंतप्रधानांना अस्सल आपल्या मातीतल्या पदार्थांची चव म्हणून देणाऱ्या मुलांच्या शहाणपणाची गोष्ट.

समजा, तुम्ही पंतप्रधानांना भेटायला गेलात तर भेट म्हणून कुठला पदार्थ न्याल? मोठेपणा, विकतचा बडेजाव आणि विकतचे पदार्थ टाळून मातीतलं अस्सल शहाणपण आणि चव घेऊन काही विद्यार्थी पंतप्रधानांना भेटायला गेले. भारतातल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी, बड्या महागड्या मिठाया नाही तर आपल्या संस्कृतीचा भाग असलेले, आपल्या घरातले, आपल्या मातीतली चव घेऊन ते पंतप्रधानांना भेटले. पंतप्रधानांशी परीक्षा पे चर्चा करताना जगण्याच्या शहाणपणात मात्र त्यांनी पैकीच्या पैकी गूण मिळवले(PM Modi relishes Chhattisgarh's local snacks thethri and khurmi during 9th edition of ‘Pariksha pe Charcha).

छत्तीसगडच्या विद्यार्थ्यांची आणि तिथल्या पदार्थांची ही गोष्ट. ठेठरी आणि खुरमी असे हे दोन पदार्थ पंतप्रधानांनाही फार आवडले. भारतीय खाद्यपंरेपरतलं हे वैविध्य वैभव लाखमोलाचं तर आहेच...छत्तीसगडमध्ये 'ठेठरी' आणि 'खुरमी' हे पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत, विशेषतः 'पोला' आणि 'तीज' या सणांच्या वेळी हे आवर्जून घरोघरी तयार केले जातात. कार्यक्रमादरम्यान छत्तीसगडच्या विद्यार्थ्यांनी हे पदार्थ पंतप्रधानांसाठी आणले होते. मोदींनी केवळ ते (PM Modi relishes Thethri and Khurmi during Pariksha Pe Charcha) स्वीकारलेच नाहीत, तर विद्यार्थ्यांसोबत बसून खात त्या चवीचं कौतुकही केलं. हे पदार्थ कसे कधी करतात हे समजून घेतलं.

कोणते आहेत ते दोन खास पदार्थ... 

१. ठेठरी (Thethri) :- ठेठरी हा एक नमकीन आणि कुरकुरीत पदार्थ आहे. हा प्रामुख्याने बेसनापासून तयार केला जातो. बेसनाचे लांब वेढे बनवून ते तेलात तळले जातात. हे दिसायला काहीसे कडबोळी किंवा शेवेसारखे असतात, पण याची चव आणि घडण वेगळी असते. एका भांड्यात बेसन घेऊन त्यात मीठ, ओवा, तिखट, हळद आणि गरम तेलाचे मोहन टाका. थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. या पिठाचे छोटे गोळे करून हाताने लांब वातीसारखे आकार तयार करा. या वातींना गोल वळवून किंवा वेढ्यासारखा आकार द्या (जसे आपण कडबोळी करतो). कढईत तेल गरम करून मंद आचेवर हे वेढे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

सत्यनारायणाची पूजा असो की वास्तूशांत, नेसा स्पेशल गजराज राजेशाही पैठणी! पूजेच्या दिवशी खास महाराणी लूक...

२. खुरमी (Khurmi) :- खुरमी हा एक गोड पदार्थ आहे. हा गव्हाचे पीठ आणि गूळ वापरून तयार केला जातो. काही ठिकाणी यात थोडे तांदळाचे पीठही मिसळले जाते. खुरमी तळल्यामुळे त्याला एक छान खमंगपणा येतो आणि ते बिस्किटासारखे कुरकुरीत लागते. हा पदार्थ चवीला बिस्किटासारखा लागतो आणि दीर्घकाळ टिकतो. सर्वातआधी थोड्या कोमट पाण्यात गूळ विरघळवून त्याचे पाणी तयार करून घ्या. एका परातीत गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, खोबरे, वेलची पूड आणि तुपाचे मोहन घालून नीट मिक्स करा. आता गुळाच्या पाण्याचा वापर करून घट्ट पीठ मळून घ्या. या पिठाचे छोटे चपटे गोळे (बिस्किटासारखे) तयार करा. त्यावर चमच्याने किंवा साच्याने नक्षी पाडू शकता. मंद आचेवर हे खुरमी नीट तळून घ्या जेणेकरून ते आतून कच्चे राहणार नाहीत.

ना तंदूर, ना ओव्हन! प्रेशरकुकरमध्ये करा अस्सल ढाबा स्टाईल तंदुरी रोटी - मऊ, कुरकुरीत...

 

English
हिंदी सारांश
Web Title : Chhattisgarh students' traditional snacks charm PM Modi; recipes go viral.

Web Summary : Chhattisgarh students gifted PM Modi Thethri and Khurmi, traditional snacks, during 'Pariksha pe Charcha'. He enjoyed the treats, sparking recipe searches nationwide. These snacks, made of besan or wheat and jaggery, are popular during festivals.
टॅग्स :अन्नपाककृतीनरेंद्र मोदी