Lokmat Sakhi >Food > पितृपक्ष विशेष: फक्त २० मिनिटांत करा दाटसर, चवदार तांदळाची खीर, घ्या एकदम सोपी रेसिपी 

पितृपक्ष विशेष: फक्त २० मिनिटांत करा दाटसर, चवदार तांदळाची खीर, घ्या एकदम सोपी रेसिपी 

Pitru Paksha Special Tandalachi Kheer Recipe: पक्ष पंधरवाडा म्हणजेच पितृपक्षामध्ये तांदळाची खीर करण्यापुर्वी ही रेसिपी एकदा बघाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2025 17:40 IST2025-09-05T17:39:25+5:302025-09-05T17:40:28+5:30

Pitru Paksha Special Tandalachi Kheer Recipe: पक्ष पंधरवाडा म्हणजेच पितृपक्षामध्ये तांदळाची खीर करण्यापुर्वी ही रेसिपी एकदा बघाच...

pitru paksha special tandalachi kheer recipe, how to make rice kheer for Pitru Paksha  | पितृपक्ष विशेष: फक्त २० मिनिटांत करा दाटसर, चवदार तांदळाची खीर, घ्या एकदम सोपी रेसिपी 

पितृपक्ष विशेष: फक्त २० मिनिटांत करा दाटसर, चवदार तांदळाची खीर, घ्या एकदम सोपी रेसिपी 

Highlightsअगदी अर्ध्या तासापेक्षा कमी वेळेत खूप उत्कृष्ट चवीची खीर करण्याची रेसिपी... 

गणपती बाप्पाचे विसर्जन झाले की लगेचच पक्ष पंधरवाडा किंवा पितृपक्ष सुरू होते. यानिमित्ताने घरोघरी पितरांसाठी विशेष स्वयंपाक केला जातो. त्या नैवेद्याच्या स्वयंपाकात काही पदार्थ हमखास असतातच. त्यापैकी एक पदार्थ म्हणजे तांदळाची खीर. आता तांदळाची खीर करण्याचीही एक खास पद्धत आहे. ती जर चुकली तर कधी कधी तांदळाची खीर अगदीच पातळ होते तर कधी कधी एवढी घट्ट होते की ती खाणाऱ्याला दूध भात खात असल्यासारखे वाटते (how to make rice kheer for Pitru Paksha?). म्हणूनच ती खीर परफेक्ट चवीची कशी करायची आणि त्यासाठी दूध आणि तांदूळ यांचे प्रमाण कसे ठेवायचे ते पाहूया..(Tandalachi Kheer Recipe in Marathi)

पितृपक्ष विशेष तांदळाची खीर करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ लीटर साय न काढलेले घट्ट दूध

पाव वाटी तांदूळ

२ टेबलस्पून चारोळी

'या' पद्धतीने अश्वगंधा घ्या! मिळतील ५ जबरदस्त फायदे- बीपी, शुगर नेहमीच राहील कंट्रोलमध्ये..

२ ते ३ टेबलस्पून काजू, बदाम यांचे काप आणि मनुका

पाऊण वाटी साखर

१ टीस्पून वेलची पूड

२ टेबलस्पून तूप

 

कृती 

सगळ्यात आधी तर तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर ते कापडावर टाकून पुसून घ्या.

एकीकडे कढईमध्ये दूध गरम करायला ठेवून द्या. कारण आपली इतर कामे होईपर्यंत ते व्यवस्थित आळून यायला हवे.

मुलींना कमी वयातच पाळी येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? मुलींचं बालपण जपण्यासाठी ५ टिप्स

यानंतर गॅसवर एक लहान कढई गरम करायला ठेवा आणि तिच्यामध्ये एखादा चमचा तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये सुकामेव्याचे काप आणि चारोळी घाला आणि ते खमंग तळून घ्या. यानंतर तळून झालेला सुकामेवा, चारोळी कढईतून काढून घ्या. 

 

आता  पुन्हा कढईमध्ये थोडे तूप घाला आणि त्यामध्ये तांदूळ घालून ते मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. परतून झालेले तांदूळ कढईतून बाहेर काढा. थंड होऊ द्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून ते थोडे जाडे- भरडे बारीक करून घ्या.

तरुणींमध्ये PCOS चा त्रास वाढण्याची ५ मुख्यं कारणं- वेळीच 'हे' बदल करा, त्रास कमी होईल

आता कढईतले दूध चांगले उकळून थोडे आटले असेल तर त्यामध्ये तांदळाची जाडसर पावडर आणि साखर घाला. यानंतर दूध सतत हलवत राहावे. आता खीर पुन्हा थोडी उकळू द्या आणि तिच्यामध्ये सुकामेवा तसेच वेलची पूड टाका. खीर दाटसर होऊन तिचा रंग बदलला की मग गॅस बंद करा. अगदी अर्ध्या तासापेक्षा कमी वेळेत खूप उत्कृष्ट चवीची खीर तयार झालेली असेल.. 

 

Web Title: pitru paksha special tandalachi kheer recipe, how to make rice kheer for Pitru Paksha 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.