Join us

Pitru Paksha 2021 : .....म्हणून पितृपक्षाच्या पारंपरिक स्वयंपाकात वापरत नाहीत 'या' ४ गोष्टी; चुकूनही करू नका सेवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 18:07 IST

Pitru Paksha 2021 : पितृ पक्षात काही पदार्थांचे सेवन टाळणं फायद्याचं ठरतं हे तुम्ही ऐकून असालच. या कालावधीत कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत हे जाणून घ्या.

पितृपक्षाला सुरूवात झाली आहे. कुटुंबात ज्या लोकांचे निधन झालेलं असतं त्यांना पितृ असं म्हटलं जातं. पितृपक्षाचा आरंभ २० सप्टेंबरला झाला.  या दरम्यान आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो आणि पूर्वजांना त्यांच्या स्मृतीमध्ये विधीनं संतुष्ट करतो. असे मानले जाते की पितृ पक्षाच्या वेळी पितर कोणत्याही स्वरूपात येतात आणि अन्न ग्रहण करतात. अशावेळी आपण काही चुका करणं टाळायला हवं. पितृ पक्षात काही पदार्थांचे सेवन टाळणं फायद्याचं ठरतं हे तुम्ही ऐकून असालच. या कालावधीत कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत हे जाणून घ्या.

लसूण- कांदा

पितृ पक्षात लसूण आणि कांदा टाळावा. लसूण आणि कांदा तामसिक खाद्यपदार्थांमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे पितृपक्षाच्या वेळी लसूण आणि कांदा थोडा टाळावा असे मानले जाते. यासह, मांस, मासे आणि अल्कोहोलचे अजिबात सेवन करू नका.

शिळं अन्न

जर तुमच्या घरात श्राद्ध असेल तर ज्याच्याकडून खायला दिले जात आहे आणि त्याला खायला घालते त्यांनी दोघांनीही शिळ्या अन्नापासून दूर राहावे. असे मानले जाते की या दिवसांमध्ये शिळे अन्न खाऊ नये.

अळूवड्या खाल्ल्यानं फर्टिलिटी वाढण्यासह मेंदूलाही होईल फायदा; तज्ज्ञांनी सांगितले अळूवड्यांचे फायदे

या भाज्या खाणं टाळा

बटाटे, मुळा, अरबी आणि कंद असलेल्या भाज्या पूर्वजांना दिल्या जात नाहीत. म्हणून श्राद्धाच्या वेळी अशी भाजी बनवू नका, किंवा ती कोणत्याही ब्राह्मणाला देऊ नका. श्राद्धात कोणत्याही स्वरूपात हरभरा वापरला जात नाही. हरभरा, सातू सुद्धा खाल्ले जात नाही. 

रोज सकाळी चहा लागतोच? मग चहा पिताना फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा; आजारपण नेहमी राहील लांब

मसूर डाळ

कोणत्याही प्रकारचे कच्चे अन्न म्हणजे मसूर, तांदूळ आणि चपाती श्राद्धादरम्यान खाल्ली जात नाही किंवा दिले जात नाही. तरीही मूग आणि उडीद डाळ यासारख्या इतर डाळींचा वापर दहीवडा आणि कचोरी वगैरे बनवण्यासाठी केला जाऊ शकतो, परंतु श्राद्धा दरम्यान मसूर डाळ कोणत्याही स्वरूपात वापरली जात नाही.

टॅग्स :पितृपक्षअन्न