Join us

साबुदाण्याच्या खिचडीचा गिचका होतो? खिचडी मोकळी-सुटसुटीत होण्यासाठी करा फक्त १ गोष्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2024 14:19 IST

Perfect easy Recipe of Sabudana Khichadi : साबुदाण्याची खिचडी होईल छान चविष्ट-मोकळी

साबुदाण्याची खिचडी ही आपल्यापैकी अनेकांच्या आवडीची गोष्ट. साबुदाण्यातून शरीराला विशेष पोषण मिळत नसले तरी बटाटा, दाण्याचा कूट घातलेली गरमागरम खिचडी खायला आपल्याला आवडते. उपवासाला तर आपल्याकडे आवर्जून साबुदाण्याची खिचडी केली जाते. चतुर्थी, एकादशी, नवरात्र किंवा शनिवार, सोमवार यांसारखे उपवास बरेच जण करतात आणि या दिवशी खिचडी खातात. चवीला अतिशय छान लागणारी ही साबुदाणा खिचडी करायला सोपी असली आणि झटपट होत असली तरी ती चांगली होईलच अशी नाही (Perfect easy Recipe of Sabudana Khichadi). 

कारण साबुदाणा चांगला भिजला, खिचडी मोकळी झाली तरच ती खायला छान लागते. पण जर खिचडी गिचका झाली तर मात्र ती म्हणावी तितकी चांगली लागत नाही.  खिचडी मोकळी होण्यासाठी साबुदाणा चांगला असण्यापासून ते तो नीट परतेपर्यंत सगळ्या गोष्टी नीट झाल्या तर खिचडी मस्त मोकळी आणि चविष्ट होते. पाहूयात खिचडी मोकळी होण्यासाठी नेमकं काय करायचं याबाबत सरीता पद्मन काही महत्त्वाच्या टिप्स देतात, त्या कोणत्या पाहूया...

(Image : Google)

१. आपण साधारणपणे साबुदाण्यामध्ये दाण्याचा कूट, साखर आणि मीठ घालून घेतो आणि मग हे सगळे जीरं, मिरची आणि बटाटा घातलेल्या फोडणीत घालतो. 

२. दाणे काही प्रमाणात चिकट असल्याने साबुदाण्याची खिचडी केल्यानंतर ती चिकट आणि गोळा होते.

३.  त्यामुळे दाण्याचा कूट साबुदाण्यात न घालता फोडणी घातल्यावर जीरं, मिरची आणि बटाटा घातल्यावर त्यातच दाण्याचा कूट घालायचा. 

४. हा कूट तेलात परतला गेल्याने त्याचा चिकटपणा कमी होतो.

५. तसंच यामध्ये लिंबाचा रस पिळायचा आणि मग त्यात साबुदाणा घालायचा.

६. मग यामध्ये मीठ आणि साखर घालून सगळे एकजीव करायचे. 

७. असे केल्याने खिचडी छान मोकळी होण्यास मदत होते.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती