भारतीय जेवणात डाळ-भात किंवा वरण- भात हा एक अविभाज्य भाग आहे. पण अनेकदा घरी बनवलेली डाळ हॉटेल किंवा ढाब्यासारखी चविष्ट लागत नाही.(dhaba style dal tadka) घरच्या साध्या डाळीलाही जर ढाब्यावर मिळणाऱ्या डाळीसारखा खमंग वास, रंग आणि चव यायची असेल, तर त्याचं सिक्रेट फक्त मसाल्यांमध्ये नाही तर तडका देण्याच्या योग्य पद्धतीत दडलेलं असतं.(dal tempering tips)ढाब्यावरील डाळीचा तो विशिष्ट सुवास आणि वरुन दिलेला तडका आपल्या सगळ्यांना नेहमीच आकर्षित करतो. (perfect tadka for dal)घरच्या साध्या डाळीला ढाबा स्टाईल चव द्यायची असेल तर फोडणी किंवा तडक्यामध्ये सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. डाळीला फोडणी देण्याची देखील एक विशिष्ट पद्धत असते. जर मसाले जळाले तर डाळ कडवट लागते आणि जर फोडणी कच्ची राहिली तर सुवास येत नाही. आज आपण अशाच २ खास टिप्स पाहणार आहोत, ज्यामुळे आपली डाळ अगदी ढाब्यासारखी चविष्ट होईल.
व्यायाम-डाएट करुनही ढेरी कमी होत नसेल तर रोज खा ५ गोष्टी, सुटलेलं पोट आणि वाढलेली चरबी गायब
तूरडाळ, मसूर किंवा मूगडाळाची चव वाढवण्याचे काम तडका करतो. ढाबा स्टाईल डाळीचा खास सुवास योग्य तापमानावर आणि मसाल्यांमुळे येतो. तडका देताना कढई किंवा लहान पातेल्यात तेल किंवा तूप मंद आचेवर गरम करा. तेल जास्त तापलं तर मोहरी, जिरे जळतात आणि कडू लागतात. आणि तेल कमी तापलं तर मसाले नीट फुलत नाहीत.
फोडणी देताना तेलात सगळ्यात आधी मोहरी घाला ती फुलल्यानंतर जिरे घाला. यानंतर हिंग, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घालाव्यात. हिंग खूप जास्त गरम तेलात घातल्यास तो जळतो. कढीपत्ता चिरुन टाकला तर त्याचा सुगंध अधिक छान येतो.
ढाबा स्टाईल तडक्यासाठी ठेचलेला लसूण किंवा बारीक चिरलेला कांदा वापरणं सगळ्यात जास्त चांगलं आहे. लसूण आणि कांदा जिरे घातल्यानंतर घालावे आणि मंद आचेवर हलवत राहावेत. लसूण गोल्डन झाल्यानंतर हळद आणि लाल तिखट घाला. मंद आचेवर गॅस ठेवल्यास मसाला जळणार नाही. तडका तयार झाल्यानंतर तो डाळीवर घाला. वरुन कोथिंबीर आणि बटर घाला. तयार होईल ढाबा स्टाईल डाळ.
Web Summary : Achieve restaurant-quality dal at home! The secret lies in the tadka. Sauté spices properly in ghee, ensuring they don't burn. Add garlic, onions, and chili powder for a flavorful, aromatic dish.
Web Summary : घर पर रेस्टोरेंट जैसा दाल का स्वाद पाएं! रहस्य तड़के में है। घी में मसालों को ठीक से भूनें, जलने न दें। लहसुन, प्याज और मिर्च पाउडर डालकर स्वादिष्ट और सुगंधित व्यंजन बनाएं।